
कोल्हापूर :मानवतावादी भूमिकेतून मतिमंद विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शैक्षणिक सुविधे बरोबरच, कौशल्य विकास साधणाऱ्या भौतिक सुविधा देऊन मतिमंद विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी अपवादात्मक योगदान दिल्याबद्दल स्व. गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी मतिमंद विद्यालय,कागल या शाळेस रोटरी क्लब ऑफ सनराईजच्या वतीने कै. मोतीभाई फौंडेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूर येथील मुस्कान लाँन वर आयोजित शानदार समारंभात हा पुरस्कार रोटरीचे माजी जिल्हा प्रांतपाल अजय गुप्ता, सर्वोच्च न्यायालयाच्या अँड. पायल चावला, यांच्या हस्ते शाळेचे संस्थापक सचिव अतुल जोशी यांचा शाल श्रीफळ व पुरस्कार प्रदान करुन सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरी सनराईजचे अध्यक्ष केदार कुंभोजकर, माजी प्रांतपाल राजू दोषी, श्रीनिवास मालू आदि मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तीन राज्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि लौकिकपात्र संस्थाना हा पुरस्कार दिला जातो. यामध्ये महाराष्ट्र राज्यात स्व. गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी मतिमंद विद्यालय हे या पुरस्काराचे एकमेव मानकरी ठरले आहे. यावेळी या पुरस्कार समारंभासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजित पाटील, आनंदराव पाटील. प्रा. मोहन तोरगलकर उपस्थित होते.
Leave a Reply