
अलाद्दिन (सिद्धार्थ निगम) आणि यास्मीन (आशी सिंग) त्यांचे मूळ साम्राज्य बगदादमध्ये परतले आहेत. सोनी सबवरील काल्पनिक मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’ने अलास्मीनचा अचंबित करणारा पुनर्जन्म दाखवणा-या नवीन कथानकासह प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. अलाद्दिनचा शहजादा अलाद्दिन म्हणून पुनर्जन्म आणि यास्मीनच्या गरीबांची रक्षणकर्ता ऊर्फ काली चोरनी म्हणून पुनर्जन्मासह मालिकेने प्रेक्षकांना आनंद देत लोकप्रिय जोडीमधील गोंडस गमतीजमती सुरू ठेवल्या आहेत.तुर्किस्तानमधून हद्दपार करण्यात आल्यानंतर अलाद्दिन व यास्मीन त्यांच्या मार्गामध्ये एका पीर बाबाला भेटतात. बाबाचा वेष घेतलेला जिनी ऑफ दि रिंग (प्रनीत भट्ट) या जोडीला बगदादकडे जाण्याचे मार्गदर्शन करतो आणि दीर्घकाळापासून दूर असलेले मित्र अलाद्दिन व जिनू (राशुल टंडन) यांची भेट घडवून आणण्याचे ठरवतो. अलाद्दिन व यास्मीन गुहेमधील एका आव्हानात्मक मार्गाला पार करत एका जादुई दिव्याजवळ पोहोचतात. अलाद्दिनने दिवा घासताच जिनू त्यांच्यासमोर प्रकट होतो.प्रेक्षकांना नवीन अंदाजासह नवीन जिनू पाहायला मिळेल. अलाद्दिन व जिनूमधील प्रेमळ मैत्री पुन्हा बहरणार आहे. जिनू त्याच्या जादुई चटईवरून अलाद्दिन व यास्मीनला बगदादमध्ये घेऊन जातो. बगदादमध्ये उतरताच अलाद्दिनचे एका महिलेकडे लक्ष जाते, जी अम्मीसारखी (स्मिता बंसल) दिसते. पण तो निराश होतो, ती महिला कोणीतरी दुसरीच असते. यास्मीनकडे परतत असताना अलाद्दिनचा अम्मीला धक्का लागतो आणि त्यांची पहिल्यांदाच भेट होते
Leave a Reply