
कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय काल जाहीर केला या निर्णयामुळे राज्यातील मराठा समाज आतून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूर च्या वतीने बिंदू चौक येथे महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेबद्दल जाहीर निषेध करण्यात आला. “महा विकास आघाडी सरकारचा धिक्कार असो”, “मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे”, “मराठा समाजाला फसवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो” अशा घोषणा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देऊन बिंदू चौक परिसर दणाणून सोडला.
याप्रसंगी प्रास्ताविक करताना सरचिटणीस हेमंत आराध्ये म्हणाले, मागील युती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गेली ५० वर्षे प्रलंबित असणारा मराठा आरक्षणाचा प्रश्न ताकदीने सोडवला होता. परंतु दोन दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टात सुनावणी करण्याची वेळ आल्यावर या आरक्षणाला तात्पुर्ती स्थगिती मिळाली आहे. या समितीचे मुख्य अशोक चव्हाण यांच्या या स्थगितीच्या प्रतिक्रियेबद्दल निषेध व्यक्त केला. ज्या पद्धतीने मागील फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाबाबत आपली सक्षम भूमिका घेऊन टिकाऊ आरक्षण दिले होते जे हायकोर्टाने मान्य केले होते परंतु हा विषय सुप्रीम कोर्टात गेल्यावर महाराष्ट्रातील सरकार बदलेले होते आणि महाविकास आघाडीचे सरकार आले होते. या महाविकास आघाडी सरकारने या आरक्षणाबाबत गांभीर्याने विचार व अभ्यास न करता आपली भूमिका व्यवस्थित न मांडता आल्यामुळे सुप्रीम कोर्टाने या मराठा आरक्षणाला स्थगिती दिली त्याबद्दल या अकार्यक्षम महाविकास आघाडीचा निषेध करत आहे.
कोल्हापूर महानगरपालिका गटनेते नगरसेवक मा. अजित ठाणेकर म्हणाले की, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे याचे कारण असे कि, मराठा समाजाचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या या महाभकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात योग्य बाजू मांडली नाही याबद्दल काहीही न कृती करणा-या महाभकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. योग्य वकील, तज्ञांचे मार्गदर्शन, स्मन्व्याचा अभाव यामुळे या तिघाडी सरकारमध्ये मराठा आरक्षणासारखे गंभीर विषय व्यवस्थित हाताळेल जात नाहीत. त्यामुळे या नेतृत्त्वहीन, अकार्यक्षम तिघाडी सरकारचा निषेध करत आहे.
सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, मराठा समाजाच्या दृष्टीने ९ सप्टेंबर हा काळा दिवस म्हणावा लागेल. मराठा समाजाची आजची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. एकेकाळी हेक्टर, एकर मध्ये शेती असणारा मराठा समाज आता गुंठा शेतीवर येऊन पोचला आहे. नोकरी नाही, व्यवसाय करायला पुरेसा पैसा नाही, ९५% मार्क मिळून देखील या समाजातील मुलांना पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही यासाठी संघर्ष करावा लागत आहे. निष्णात वकिल बदलले गले, सुनावणी दरम्यान मराठा समाजातील तद्न्य जाणकार व्यक्तींशी चर्चा करणे गरजेचे होते. त्यामुळे माहाविकास आघाडी सरकार तर्फे वकिलांनी आपली बाजू नीट न मांडल्यामुळे मराठा समाजाला अंधारात लोटण्याचे काम या महाभकास आघाडी सरकारने केले आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका नीट न मांडता आल्यामुळे या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे याच्या निषेधार्थ आपण आज या ठिकाणी जमलो आहोत. भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या घरामध्ये एखादी केस झाल्यावर कशा कशा पद्धतीने लढा दिला जातो हे दाखवून दिले. सकल मराठा समाजाचे अनेक मोर्चे निघाले सरकारने या मोर्चाला सहकार्य केलं. कोल्हापूरातील एका मोर्चामध्ये चंद्रकांतदादा पाटील मंत्री असतना देखील चालत मोर्चात सामील झाले. त्यामुळे भारतीय जनता पार्टी म्हणून मराठा समाजाला न्याय द्यायचा होता ही भूमिका पक्की असल्यामुळे या मराठा आरक्षणाबाबत च्या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून हा प्रश्न मार्गी लावला होता. हे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भाजपा सरकारने त्याच्या फी बाबतचे विषय, मेडिकल, अभियांत्रिकी फी चे विषय असतील त्याध्ये सवलत देण्याचे काम केले. पंजाबराव देशमुख नावे वसतीगृह काढण्याचे काम केले. गेली बरीच वर्षे कॉंग्रेसचे सरकार या महाराष्ट्रामध्ये होते, ज्यांना आपण जाणते राजे म्हणतो, ज्यांना सर्व विषयातील सगळे कळते असे नेते त्यांनी का मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले नाही हा खरा प्रश्न आहे. या महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाबद्दल एवढा का राग आहे याचा विचार करणे गरजेचे आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे जे काम देवेंद्र फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील यांनी केले होते त्या कामास खीळ घाल्ण्याचे काम या महाविकास आघाडी सरकारने केले आहे. कंगना रणावत सारख्या अभिनेत्रीचे विषय जेवढ्या गांभीर्याने हे महाविकास आघाडी सरकार हाताळत आहे तेवढे गांभीर्य हे सरकार मराठा आरक्षण या विषयात का दाखवत नाही असा सवाल त्यांनी केला. ज्या ठिकाणी फायदा, चुकीच्या गोष्टी आहेत तिथे हे सरकार अत्यंत तातडीने काम करतान दिसते. त्यामुळेच या तीन तिघाडी सरकारमुळे या महराष्ट्रात एकही चांगला निर्णय होताना दिसत नाही आहे. भारतीय जनता पार्टी मराठा समाजाच्या पाठीशी असून मराठा समाजाला न्याय मिळे पर्यंत हा संघर्ष असाच सुरु राहील अशा इशारा दिला.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, संतोष भिवटे, राजू मोरे, अमोल पालोजी, विजय आगरवाल, प्रदीप उलपे, सुनीलसिंह चव्हाण, नगरसेवक अजित ठाणेकर, किरण नकाते, मंडल अध्यक्ष संतोष माळी, भरत काळे, प्रग्नेश हमलाई, डॉ.राजवर्धन, आशिष कपडेकर, अतुल चव्हाण, महादेव बिरंजे, प्रशांत नरुले, आप्पा लाड, अभिजित शिंदे, योगेश साळोखे, सागर केंगारे, ओंकार घाटगे, गणेश चिले, विजया जाधव, आसावरी जुगदार, गायत्री राऊत, प्रमोदिनी हर्डीकर, शोभा कोळी, स्वाती कदम, शुभांगी चितारी, बापू राणे, विशाल शिराळकर, दिलीप बोन्द्रे, साजन माने, निलेश आजगावकर, भैया शेटके, किरण कुलकर्णी, तानाजी निकम, मामा कोळवनकर, शारुख गडवाले, प्रशांत बर्गे, इकबाल हकीम, प्रसाद मोहिते, गौरव सातपूते, विवेक वोरा, रोहित कारंडे, ऋषींकेश मुदगल, सचिन सुतार, सचिन जाधव, ओंकार खराडे, रघुनाथ पाटील, दिनेश पसरे, प्रसाद मुजुमदार, नजीम अत्तार, संतोष जाधव, किशोर जाधव, सुशांत पाटील आदींसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply