
कोल्हापूर: सध्याच्या आव्हानात्मक काळात देखील देशभरातील शेतकऱ्यांनी आपले काम निरंतर चालू ठेवले आहे. त्यांनी चालू ठेवलेल्या अथक परिश्रमामुळे देशभरातील लाखो लोकांना अन्न पुरवठा चालू राहिला. कोविड १९ महामारी विरोधात आपल्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून पेप्सिको इंडियाने आज सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हायजिन किट्स पुरवण्याची कटिबद्धता दर्शवली. महामारीसारख्या आव्हानात्मक काळामध्ये देखील आपले काम चालू ठेवणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षा व कल्याणासाठी हे हायजिन किट्स वितरित केले जात असून यामध्ये कोविड १९ विरुद्ध लढ्यासाठी उपयुक्त असलेले मास्क आणि सॅनिटाझर यांचा समावेश आहे.याशिवाय शेतकऱ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट स्वच्छता पद्धतीनं बाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पेप्सिको इंडिया तर्फे विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे ज्यामध्ये मास्क व्यवस्थित घालणे, हाथ धुण्याच्या पद्धती व सोशल डिस्टंसिंग सारखे प्रतिबंधात्मक उपाय यांचा समावेश आहे. पेप्सिको इंडियाच्या ऍग्रो विभागाचे अध्यक्ष प्रताप बोस म्हणाले की, कोविड १९ च्या काळात देखील आपल्या प्रयन्त अन्न पोहचावे यासाठी जोखीम पत्करून निरंतर काम करणाऱ्या शेतकरी बांधावंप्रति आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. आव्हानात्मक काळात देखील कुठलीही अपेक्षा न करता त्यांनी आपले काम चालू ठेवले. एक कृषि केंद्रित कंपनी आणि भारतभरातील २७ हजारहुन अधिक शेतकऱ्यांची भक्कम संबंध असलेली कंपनी म्हणून पेप्सिको इंडियाला शेतकऱ्यांनी आपल्यापर्यंत अन्न पोहचावे म्हणून केलेल्या प्रयत्नांचे कौतुक आहे.
Leave a Reply