
कोल्हापूर:सध्या कोरोनाचे संकट असताना कोल्हापुरातील शैक्षणिक संस्था पालकांकडून भरमसाट फी वसूल करत आहेत. काहींचे व्यवसाय बंद आहेत, काहींच्या नोकर्या गेलेल्या आहेत असे असताना देखील शैक्षणिक संस्था पालकांकडून सक्तीने फी वसूल करत आहेत. एखाद्या पालकांनी फी भरली नसेल तर शाळेच्या व्हाट्सअप ग्रुप वर टाकून पालकांची बदनामी करत आहेत. असे भारतीय जनता पार्टी च्या निदर्शनास आले. या अन्यायाविरोधात भारतीय जनता पार्टी कोल्हापूर तर्फे शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर सत्यवान सोनवणे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यात शिक्षण उपसंचालक सोनवणे व अन्य शिक्षणाधिकारी असमर्थ ठरले. परंतु भाजपाच्या निवेदनाची गंभीर दखल घेत शिक्षण उपसंचालकांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शाळांवर तात्काळ कारवाई करून 10 दहा दिवसात याबाबतचा अहवाल सादर करावा असे लेखी आदेश दिले.यावेळी सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई, दिलीप मेत्रानी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply