
मालिका ‘बालवीर रिटर्न्स’चे चाहते व प्रेक्षकांना अॅक्शनने भरलेले एपिसोड्स पाहायला मिळणार आहेत. सोनी सबवरील काल्पनिक मालिका ‘बालवीर रिटर्न्स’ प्रेक्षकांना थरारक राइडवर घेऊन जाणार आहे, जेथे आगामी आठवडे रोमांचक ट्विस्ट्स व उलगड्यांनी भरलेले आहेत. पाण्याखालील विश्वाला असलेला नवीन धोका – शिंकाई पृथ्वीच्या अवतीभोवती गिरक्या घालत आहे. बांबाल (विमर्श रोशन),मिल्सा (श्वेता खंदूरी) आणि राय (शोएब अली) पृथ्वीवर सुपरशक्तीच्या शोधात आले आहेत. आगामी एपिसोड्समध्ये विवानचे (वंश सयानी) जीवन धोक्यात असल्याचे पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनी आगामी एपिसोड्समध्ये रोमांचक व थरारक ट्विस्ट्स पाहण्यासाठी सज्ज राहा.शिंकाईचे दुष्ट त्रिकूट – बांबाल, मिल्सा व राय यांना पृथ्वीवर सुपरशक्ती असल्याचे समजले होते. पृथ्वीवर आल्यानंतर त्यांना नकाबपोश (देव जोशी) व त्याच्या शक्तींबाबत समजते. यादरम्यान मिल्साला तिच्या जवळच उभा असलेल्या एका मुलामध्ये प्रबळ जादुई शक्ती असल्याचे जाणवते, पण ती त्याचा चेहरा पाहण्यामध्ये अयशस्वी ठरते. बांबालला पृथ्वीवर आणखी एक सुपरशक्ती असल्याचे समजते. ही सुपरशक्ती युवा मुलगा विवानमध्ये असते. बांबाल विवानला जाळ्यात अडकवण्याचे ठरवतो आणि रायला अनोखी शक्ती देण्यासाठी त्याचा प्लाझ्मा वापरतो. तो युवा सहजपणे जाळ्यात अडकेल असा विचार करत बांबाल त्याची जादू पसरवतो, जी विवानला शोधून काढेल.दुसरीकडे विवानला येणा-या धोक्याबाबत काहीच माहित नसते आणि तो सहभाग घेणार असणा-या आगामी कॉलेज कॉन्सर्टसाठी तयारी करत असतो.बांबाल व राय विवानचे अपहरण करण्यामध्ये यशस्वी होतील का? बालवीर विवानला वाचवू शकेल का?
Leave a Reply