
अलाद्दिन (सिद्धार्थ निगम) आणि यास्मीन (आशी सिंग) यांच्या कौशल्यांची परीक्षा घेतली जाणार आहे आणि मुख्याध्यापिका रूख्सार बेगम (स्मिता बंसल) ही परीक्षा घेणार आहे. सोनी सबवरील काल्पनिक मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’ने अलास्मीनचा पुनर्जन्म दाखवणा-या नवीन कथानकासह प्रेक्षकांना अचंबित केले. अलाद्दिनचा शहजादा अलाद्दिनच्या रूपात पुनर्जन्म आणि यास्मीनचा गरीबांची रक्षणकर्ता काली चोरनीच्या रूपात पुनर्जन्मासह मालिकेमध्ये या लोकप्रिय जोडीमधील प्रेमळ गमतीजमती पाहायला मिळत आहेत, ज्यामधून प्रेक्षकांना भरपूर आनंद मिळत आहेत. यामध्ये अलाद्दिन व अम्मी ऊर्फ रूख्सार बेगम यांच्या अद्वितीय नात्याची भर करण्यात आली आहे.बगदादचा मुकुट चोरण्याचे मिशन पूर्ण करण्यासाठी यास्मीन व अलाद्दिन यांना रूख्सार बेगम चालवत असलेल्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागणार आहे. पण या शाळेमध्ये प्रवेश मिळवणे तितकेसे सोपे नाही. अलाद्दिनला प्रवेश मिळवण्यासाठी त्याची गुणवत्ता व क्षमता सिद्ध करावी लागणार आहे. रूख्सार अलाद्दिनला एक आव्हान देते, ज्यामध्ये त्याला दिग्गज हातोडा उचलावा लागणार आहे. दुसरीकडे शहजादा अलाद्दिनची बगदादमध्ये राहण्याची आणि या परीक्षा देण्याची इच्छा नाही. पण त्याला माहित नाही की, या परीक्षांमध्ये एक मोठे मिशन आणि त्याचे नशीब यांचे गुपित सामावलेले आहे.
Leave a Reply