अनूषा मिश्रा व हर्षद अरोरा म्‍हणतात,”पत्रकाराची भूमिकेत शिकायला मिळते

 

सोनी सबवरील हलकी-फुलकी विनोदी मालिका कॅरी ऑन आलियाने नुकतेच नवीनरोमांचक कथानक सादर केले. आलियासह इतर शिक्षकांनी टेलिव्हिजन न्‍यूज रिपोर्टर्स म्‍हणून नवीन प्रवास सुरू केला आहे. सोनी सबवरील उत्‍साही आलियाचा नुकताच नवीन मेकओव्‍हर होताना पाहायला मिळाला. तिने क्‍लासरूमपासून न्‍यूजरूमपर्यंतचा तिचा प्रवास सुरू ठेवला आहे. त्‍यांचा प्रवास पुढे सरकत असताना आलिया व अलोकने वेळ काढत देशभरातील वास्‍तविक जीवनातील पत्रकारांचे ते दररोज घेत असलेल्‍या मेहनतीसाठी कौतुक केले.मालिकेने न्‍यूज रिपोर्टिंग हा नवीन बदल घेतला आहे आणि आलिया न्‍यूज अँकरच्‍या भूमिकेत न्यूज चॅनेल देश की धडकनमधील नवीन कथानकासह प्रेक्षकांना मंत्रमुग्‍ध करत आहे. हा नवीन बदल धमाल राइड्नी भरलेला आहे, जेथे आलिया आणि टीम त्‍यांची पत्रकारिता कौशल्‍ये व अद्वितीय विचारसरणींचा उपयोग करत स्‍थानिक समस्‍या व घटनांचे निराकरण करण्‍याच्‍या मिशनच्‍या दिशेने कार्य करतात. आलिया उत्‍साही न्‍यूज अँकरच्‍या भूमिकेत आनंद पसरवणार आहे, तर अलोक धडाकेबाज क्रीडा व आरोग्‍य पत्रकार म्‍हणून छाप पाडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!