इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटरतर्फे आयुर्वेदिक “केमो रिकव्हरी कीट्स”चे  उद्घाटन 

 

पुणे: कॅन्सर सारख्या आजारावर आयुर्वेद आणि अलोपथी ह्यांनी एकत्र येऊन उपचार करणे रुगणांच्या हिताचे असून भारतीय संस्कृति दर्शन ट्रस्ट द्वारा संशोधन करून पेटंट  करण्यात आलेले केमो रिकवरी किट हे कॅन्सर रुगणांच्या जलद उपचारासाठी हे वरदायी ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोशियारी ह्यांनी राजभवनात झालेल्या केमो रिकव्हरी कीट्स लोकर्पण कार्यक्रमात बोलताना केले.भारतीय संस्कृति दर्शन ट्रस्ट संचालित इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे तर्फे अथर्व नेचर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड व्दारे २ आयुर्वेदिक औषधी योग “केमो रिकव्हरी कीट्स”चे (आयुर्वेदिक चिकित्सा केमोथेरपी मुळे उद्भवणारे उपद्रव कमी करण्यासाठी) उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आदरणीय श्री. भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले .  ह्या कार्यक्रमाला पद्मभूषण अशोक कुकडे, पद्मभूषण देवेंद्र त्रिगुणा, प्रमुख संशोधक वैद्य सदानंद सरदेशमुख, जेष्ठ उद्योगपती रतन टाटा आदि मान्यवर ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते. “शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या आयुर्वेद चिकित्सा पद्धति मध्ये सातत्याने संशोधन करत राहण्याची गरज आहे. आयुर्वेदिक औषधाच्या निर्मितिसाठी फक्त मार्केटिंग च्या मागे न लागता संशोधनावर अधिक भर देण्याची सध्या आवश्यकता असल्याचे  कोशियारी पुढे म्हणाले. कॅन्सर च्या उपचारासाठीच्या ह्या संशोधनाला जागतिक पातळीवर मान्यता मिळवून द्यायला पेटंट उपयोगी पडणार असून टाटा ट्रस्ट ह्या मध्ये सहभागी असल्याचा अभिमान असल्याचे प्रतिपादन पद्मभूषण रतन टाटा ह्यांनी  ह्या प्रसंगी बोलताना व्यक्त केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!