
बाबरी मशीद विध्वंस खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) विशेष न्यायालयाने दिला. त्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो. या निकालामुळे ‘सत्यमेव जयते’ पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत श्रीराम जन्मभूमी असल्याचा निर्णय देऊन श्रीराम मंदिराच्या उभारणी करण्याचा आदेश दिला होता. त्याचवेळी बाबरी मशीद हे अनधिकृतरित्या केलेले बांधकाम असल्याचे सिद्ध झाले होते, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी म्हटले आहे.श्री. शिंदे पुढे म्हणाले की, रामजन्मभूमीच्या संदर्भात सरकारकडून होणार्या निर्णयामुळे जनमानसात उद्रेक झाला होता. याच्या पुढे जाऊन आमचे म्हणणे आहे की, या बाबरी विध्वंसानंतर देशभरात दंगली घडविण्यात येऊन हिंदू समाज आणि मंदिरे यांना लक्ष्य केले गेले. त्यातील एक प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम हा अद्याप पकडला गेलेला नाही. पाकिस्तान आणि बांगला देश यांत शेकडो मंदिरे पाडण्यात आली. वर्ष 1990 मध्ये काश्मिरमधून लाखो हिंदूंना विस्थापित केल्यावर तेथील अनेक मंदिरांचा विध्वंस करण्यात आला. त्यांना न्याय मिळाला आहे का ? आंध्र प्रदेशातही सध्या अनेक हिंदू मंदिरातील मूर्ती तोडण्याचे सत्र चालूच आहे. याविषयी कोणी का बोलत नाही ? या निकालासोबत आमचे म्हणणे आहे की, हिंदूंच्या जनभावनांचा आदर केला गेला पाहिजे. हिंदूंची जी मंदिरे पाडली गेली आहेत, त्यांचे पुनर्निर्माण केले गेले पाहिजे.
Leave a Reply