सोनी सबवरील मालिका ‘मॅडम सर’मध्‍ये कोण ठरणार सर्वोत्तम एस.एच.ओ?

 

आपल्‍या सर्वोत्तम अभिनयाने सर्वांची मने जिंकलेल्‍या सोनी सबवरील मालिका ‘मॅडम सर’मधील चार महिला पोलिस अधिकारी त्‍यांच्‍या अद्वितीय पोलिस कर्तव्‍यांसह प्रेक्षकांचे छान मनोरंजन करत आहेत. आपल्‍या अनोख्‍या पद्धतीने अनेक अवघड केसेसचे निराकरण केलेली करिष्‍मा सिंग (युक्‍ती कपूर) आता लाडकी हसीना मलिकसह (गुल्‍की जोशी) लखनौमधील महिला पोलिस थानाची एस.एच.ओ (स्‍टेशन हाऊस ऑफिसर) बनली आहे. पोलिस स्‍टेशनमध्‍ये आता दोन एस.एच.ओ. आहेत आणि दोघीही त्‍यांच्‍या विभिन्‍न विचारसरणींमधून केसेस सोडवण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत.करिष्‍मा ही तात्‍पुरत्‍या कालावधीसाठी एस.एच.ओ. आहे. ती हसीनापेक्षा तिचे पोलिसी कर्तव्‍य उत्तम असण्‍याचे सिद्ध करण्‍यासाठी कोणतीच कसर सोडणार नाही. पोलिस स्‍टेशनमध्‍ये नवीन केस आली असल्‍यामुळे करिष्‍मा व हसीनाला त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या अनोख्‍या पद्धतीने केस हाताळण्‍याची संधी मिळाली आहे. दोन सोशल मीडिया सेलिब्रिटीज एकमेकांच्‍या गोष्‍टी चोरण्‍याचा आरोप करतात आणि यामागील सत्‍य शोधण्‍याची जबाबदारी आता दोन्‍ही एस.एच.ओ.वर आहे. चोरांची प्रेस कॉन्‍फरन्‍स आयोजित करणारी करिष्‍मा तिच्‍या पद्धतीने चोराला ओळखण्‍यामध्‍ये असमर्थ ठरते आणि हसीना त्‍यानंतर भार सांभाळते. ती एक पार्टी आयोजित करते, ज्‍यामध्‍ये तिला खरा चोर येण्‍याची अपेक्षा असते, पण काहीतरी अनपेक्षित घडते. चोर मिळेल का की त्‍यांच्‍यामधील स्‍पर्धेमुळे पोलिस स्‍टेशनमध्‍ये समस्‍या निर्माण होईल?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!