मालिका ‘बालवीर रिटर्न्‍स’च्‍या सेटवर भेटा मजेशीर मित्रांच्‍या गँगला

 

असे म्‍हणतात की ‘काही मैत्री सर्वात अनपेक्षित क्षणी होतात’, असेच काही ‘बालवीर रिटर्न्‍स’चा डायनॅमिक ग्रुप – देव जोशी, शोएब अली, अनाहिता भूषण व वंश सयानी यांच्‍या बाबतीत घडले आहे. ते शिंकाईचे पाण्‍याखालील अद्भुत विश्‍व घेऊन आलेल्‍या नवीन सीझनमध्‍ये त्‍यांच्‍या अद्वितीय अभिनयासह ‘बालवीर रिटर्न्‍स’च्‍या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. ही तरूण ‘बालवीर रिटर्न्‍स’ टीम त्‍यांच्‍या पात्रांच्‍या अद्वितीय सादरीकरणासह प्रेक्षकांना प्रभावित करत आहे. मालिकेमध्‍ये शोएब अली ऊर्फ राय आणि इतरांमधील संबंध जटिल असण्‍यासोबत तो अनन्‍या, देबू व विवानसमोर दुष्‍ट शक्‍ती असला तरी पडद्यामागे या सह-कलाकारांमधील साहचर्य उत्तम आहे. चला तर मग याबाबत ‘बालवीर रिटर्न्‍स’च्‍या कलाकारांकडून अधिक जाणून घेऊ या.आपल्या सह-कलाकारांसोबत काम करण्‍याच्‍या आनंदाबाबत बोलताना शोएब म्हणाला, “माझ्या सह-कलाकारांसोबत काम करताना खूप धमाल येते. ते सर्व जवळपास माझ्या वयाचेच आहेत. सेटवरील उत्‍साह आणि ऊर्जा नवीनव रोमांचक आहे. सेटवर काम करणे हेआपल्या मित्रांसह आठवणी तयार करण्यासारखे आहे. अलीकडेच आम्ही महाविद्यालयीन मैफिलीचा सीक्‍वेन्‍सदेखील शूट केला आणि यामुळे मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवले. मैफिलीसाठी आम्ही एकत्र अभ्यास केला, नृत्य केले आणि आठवड्यातले सर्वात अविस्मरणीय शूटींग केले. माझे सह-कलाकारांसोबतखासकरून देव, अनाहिता आणि जीवन यांच्यासोबत चांगलेसंबंध निर्माण झाले आहेत. जरी देव आणि मी बरेच सीक्‍वेन्स एकत्रित शूट केलेले नसले तरी आम्ही एकत्र शूटिंग करताना खूप धमाल करतो. विवानसोबत असताना पूर्णत: वेगळा उत्‍साह वाटतो. तो पूर्णपणे ऊर्जेने भरलेला आहे आणि नेहमीच सेटवर काहीतरी नवीन करण्‍यास सज्‍ज असतो. इतक्‍या तरूण वयामध्‍ये तो अत्‍यंत प्रतिभावान व मेहनती आहे. मी अनाहितासोबत विविध सीन्‍सचे शूटिंग केले आहे आणि ती अत्‍यंत मोहक व समजूतदार सह-कलाकार आहे. ती नैसर्गिकपणे अभिनय सादर करते. मी भाग्‍यवान आहे की मला ‘बालवीर रिटर्न्‍स’ सारख्‍या लोकप्रिय मालिकेमध्‍ये काम करण्‍याची व अशा अद्वितीय कलाकारांसोबत काम करण्‍याची संधी मिळाली. हे सर्व माझे खास मित्र बनले आहेत. मी भविष्‍यात देखील अशीच धमाल करण्यासोबत नवनवीन गोष्‍टी शिकण्‍याची अपेक्षा करतो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!