महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार;डॉ.कादंबरी बलकवडे यांनी स्विकारला

 

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आयुक्त्‍ पदाचा कार्यभार डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आज मावळते आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांच्याकडे स्विकारला.नुतन आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे या 2010 च्या आयएएस बॅचच्या असून त्यांनी 2010-15 या कालावधीत नागालॅण्ड येथे कार्यरत होत्या. 2015 – 16 यांनी अतिरिक्त्‍ जिल्हाधिकारी नागपूर, 2016- 18 या कालावधीत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर येथे काम केले असून, 2018 पासून त्या जिल्हाधिकारी गोंदिया म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी गोंदिया येथे लोकसभा, विधानसभा, पोटनिवडणूकही यशस्वीपणे पार पाडली.कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन अधिक गतीमान, पारदर्शक, लोकाभिमूख आणि नियमांचे पालन करुन करण्यावर आपला अधिक भर राहिल असे सांगून नुतन आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे म्हणाल्या, कोल्हापूर जिल्हयात काम करण्याची संधी मिळाली असून महानगरपालिकेच्या माध्यमातून अधिक चांगले काम करुन राज्यातील एक आदर्श महानगरपालिका म्हणून लौकिक कायम राखू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!