
भयावह मेहझबीनने (काजल जैन) दिलेल्या आव्हानांकडे घेऊन जाणारा मार्ग अधिक धोकादायक बनणार आहे. सोनी सबवरील काल्पनिक मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा‘मध्ये नुकतेच अलाद्दिन (सिद्धार्थ निगम),यास्मीन (आशी सिंग),शीफान (अमित रघुवंशी),कोयल (शिवानी बदोनी) आणि जिनू (राशुल टंडन) हे जादुई दिवा शोधण्याच्या थरारक प्रवासावर निघालेले पाहायला मिळाले. रहस्यमय मेहझबीन या दिव्याचे संरक्षण करते. प्रेक्षकांनी रोमांचपूर्ण अनुभवासाठी सज्ज राहा, कारण त्यांना लवकरच धक्कादायक व अॅक्शन-पॅक सीक्वेन्सेस पाहायला मिळणार आहेत. धडधडणा-या हृदयाच्या रहस्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत असलेला सर्वांचा लाडका शहजादा अलाद्दिन आणि त्याची टोळी कापलेल्या हाताच्या रहस्याचा उलगडा करण्याच्या प्रवासावर जाणार आहेत. बगदादमध्ये स्थिती अत्यंत भयानक होणार आहे.अलाद्दिन व त्याच्या टोळीला अखेर धडधडणा-या हृदयाचा स्रोत सापडला आहे. पण स्रोताजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा उंच राक्षस नजरबट्टूशी सामना होतो. या राक्षसाबाबत काहीच माहित नसल्यामुळे अलाद्दिनला त्याच्यासोबत कसे लढावे हे समजत नाही. तो अम्मी त्याच्यासाठी गाणारे अंगाईगीत (लोरी) गाऊ लागतो. सर्वजण अचंबित होतात, कारण अंगाईगीत कामी येते आणि राक्षस गाढ झोपी जातो. अलाद्दिन धडधडणा-या हृदयाच्या रहस्याचा उलगडा करतो. मेहझबीन कापलेल्या हातामागील रहस्याचा उलगडा करण्याचे पुढील भयानक आव्हान देते. हा कापलेला हात फक्त जंगलामधील एका रहस्यमय कॉटेजमध्ये सापडू शकतो.अलाद्दिन, कोयल व जिनू कापलेल्या हाताचा शोध घेण्याचा प्रवास सुरू करतात. पण स्थितीला भयानक वळण मिळते, जेथे जिनू व कोयलचे अपहरण होते आणि अलाद्दिन जंगलामध्ये एकटाच राहतो.अलाद्दिन त्याच्या सहका-यांना कशाप्रकारे शोधेल आणि कशाप्रकारे कापलेल्या हातामागील रहस्याचा उलगडा करेल?
Leave a Reply