
कागल:सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त कागलमध्ये कोरोना योद्धांचा सत्कार झाला. तसेच कोरोनाशी लढणाऱ्या पोलीस, नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी, पत्रकार व आरोग्य विभागाच्या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना वाफेचे मशीन, सॅनिटायझर, मास्क अशा साहित्याचेही वाटप यावेळी झाले. असंघटित कामगारांना धान्याचे वाटपही झाले.कागलमध्ये नामदार हसन मुश्रीफ फाऊंडेशन व नवीद मुश्रीफ युवा अधिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने होते. प्रमुख पाहुणे म्हणून कागल चे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे व नगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते .यावेळी बोलताना भैय्या माने म्हणाले,
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गेली ३५-४० वर्षे चालवलेला जनसेवेचा वसा नवीद मुश्रीफ समर्थपणे पुढे चालवीत आहेत. एक संयमी, सुसंस्कारी व विधायक युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.कोरोनावर यशस्वी मात केल्याबद्दल प्रताप उर्फ भैय्या माने, उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, यांच्यासह कोरोना महामारी संघर्ष करणाऱ्या कागल नगरपालिकेचे पदाधिकारी नितीन दिंडे, प्रवीण काळबर, आनंदा पसारे, सतीश घाडगे, विवेक लोटे, संजय चितारी यांचेही सत्कार झाले. तसेच यावेळी बा.ल.वंदूरकर, नरेंद्र बोते, जहांगीर शेख, भास्कर चंदनशिवे, सदाशिव आंबोसे, इम्रान मकानदार, कृष्णात कोरे, नंदकुमार कांबळे, तानाजी पाटील, सम्राट सनगर, सचिन नाईक, प्रभाकर भिंगारे या पत्रकारांचेही सत्कार झाले.राष्ट्रवादीचे कागल शहराध्यक्ष संजय चितारी यांच्यावतीने उपस्थितांना १५१ शिवभोजन थाळीचे वाटप झाले. प्रवीण काळबर यांच्यावतीने साडेतीन हजार सॅनिटायझर बॉटलचे वाटप झाले. राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक शहराध्यक्ष पंकज खलिफ यांच्यावतीने प्रभाग क्रमांक एकमधील २१ बांधकाम कामगारांची नोंदणी व त्यांना प्रमाणपत्र वितरण व डॉक्टरांना सॅनिटायझरचे वाटप झाले.यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, नितीन दिंडे, प्रवीण काळबर यांची मनोगते झाली.
यावेळी प्रताप उर्फ भैय्या माने, प्रकाशराव गाडेकर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, पक्षप्रतोद नितीन दिंडे, प्रवीण काळबर, आनंदा पसारे, सतीश घाडगे, विवेक लोटे, संजय चितारी, सदाशिव पिष्टे, संजय ठाणेकर, अरुण लाड, संग्राम लाड, अमित पिष्टे, तुषार भास्कर, नासीर नाईक, अमोल डोईफोडे, मुकेश मठूरे, भिकाजी देवकर, बाबासो नाईक, मोहसिन मुल्लांनी, प्रदीप राजपूत, बॉबी बालेखान, विजय दाभाडे, प्रवीण सोनुले, अनिल सदलगे, मुन्ना शाणेदिवान, हरुन मुजावर, अरुण पोवार, संदीप बोबाटे आधी उपस्थित होते.
Leave a Reply