शारदीय नवरात्रौत्सवनिमित्ताने अंबाबाईच्या पारंपरिक दागिन्यांची स्वच्छता

 

कोल्हापूर : अवघ्या चार दिवसांवर शारदीय नवरात्र उत्सव आला आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात जोरदार तयारी सुरू आहे. आज मंदिरातील गरुड मंडपात देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या उपस्थितीत करवीर निवासिनी अंबाबाईच्या पारंपरिक दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली.
साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरा केला जातो. मात्र,यंदा कोरोनाच्या संकटामुळे देशातील सर्व मंदिरे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे यावर्षी अंबाबाई मंदिरातील नवरात्र उत्सव भाविकांविना साजरा करण्याचा निर्णय देवस्थान समिती मार्फत घेण्यात आला आहे. अवघ्या दोन दिवसांवर नवरात्री आल्याने मंदिरातील कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.याच पार्श्वभूमीवर आज अंबाबाई देवीच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली. नवरात्र उत्सव काळात नऊ दिवस देवीची विविध रूपात सालंकृत पूजा बांधण्यात येते. यावेळी पारंपरिक दागिने देवीला परिधान केले जातात. या शाही दागिन्यांची आज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या उपस्थितीत परंपरागत कारागीरांनी दागिन्यांची स्वच्छता केली.
याचबरोबर देवस्थान समिती मार्फत येत्या काही दिवसांत देवीचे धुर्मिळ दागिने भक्तांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.यावेळी देवस्थानचे सदस्य शिवाजीराव जाधव, एन.डी जाधव,धनाजी जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
नवरात्र उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर देवी अंबाबाई चे मंदिर स्वच्छ करण्यात आले आहे मंदिरास विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.कोरोनाचा पार्श्‍वभूमीवर देवी अंबाबाई चे चारी दरवाजे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहेत यावर्षी नवरात्र उत्सव नियमित साजरा होणार आहे मात्र भाविकांना मंदिरात देवीच्या दर्शनासाठी प्रवेश दिला जाणारा नसल्याने भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आली आहे. कोरोणाच्या काळात एक वर्ष देवीचे दर्शन नाही घेतले तरी भक्तांना ऑनलाईन दर्शनाची सोय आम्ही उपलब्ध केली आहे याद्वारे देवीचे दर्शन भाविकांनी घ्यावे असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!