सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे सणांसाठी प्रतिटन ५० रुपये : नवीद मुश्रीफ

 
कापशी: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यांने २०१९-२० या  हंगामांमध्ये गळीतास आलेल्या ऊसपिकास एफ.आर.पी. पोटी २८०० रुपये प्रतिटन अदा केले होते. ऊस उपलब्धतेसाठी व  तालुक्यातील इतर कारखान्यांच्या दराबाबत स्पर्धेसाठी २९००/- रु. प्रतिटन कारखाना ऊसउत्पादक शेतकऱ्यांना देईल, असे अभिवचन कारखाना व्यवस्थापनाने दिले होते. त्यापोटी ५०/- रुपये प्रतिटन गणपती उत्सव काळामध्ये व दसरा-दिपावली सणाच्या दरम्यान ५०/- रुपये प्रतिटन देण्याचे अभिवचन दिले होते. दरम्यान, गणेशोत्सव काळामध्ये ५०/- रुपये अदा केले असून दसरा- दिपावली सणाच्या निमित्ताने बुधवार दि.१४ ऑक्टोबर २०२० रोजी ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केले असून शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत जाऊन पैसे घेऊन जाण्याची विनंती आहे. कारखान्याचे अध्यक्ष नवीन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.या पत्रकात अध्यक्ष श्री मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यांने आतापर्यंत दिलेल्या सर्व वचनांची पूर्तता केलेली आहे.दरम्यान, साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ रविवार दि. १८ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी नऊ वाजता व गळीत हंगाम शुभारंभ शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर २०२० रोजी होत आहे. तोडणी-वाहतूकदारांची कोरोना महामारीबाबत कारखाना व्यवस्थापन पूर्ण  काळजी घेईल.  दवाखाना, औषधोपचार, दुर्दैवाने दुर्दैवी  घटना घडल्यास कारखाना व्यवस्थापनाने महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या माध्यमातून सर्वांची जबाबदारी घेतली आहे.
सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला उत्पादित कारखान्यास घालून सहकार्य करावे, अशी विनंती आहे. या गळीत हंगामात नऊ लाख मेट्रिक टन गळीत करण्याचा संकल्प व्यवस्थापनाने केला आहे. सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!