
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या पदाधिका-यांच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली शिवाजी विद्यापीठाचे नुतन कुलगुरू प्रा.डॉ.डी.टी. शिर्के यांची सदिच्छा भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी विविध विषयांवर कुलगुरू डी.टी शिर्के यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. याप्रसंगी बोलताना कुलगुरू म्हणाले, विद्यापीठ म्हणजे एक विचार असतो आणि त्यातून शिकलेला विद्यार्थी हा त्या विचारांचा पाठीराखा असतो. ज्या विद्यापीठा मध्ये मी शिक्षण घेतले त्याच विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्त होणे ही माझ्यासाठी खूप आनंददायी गोष्ट असल्याचे नमूद केले. विद्यापीठाच्या असणा-या पूर्वानुभवामुळे पदभार स्वीकारताच कामांना सुरवात करण्यात आली आहे. सध्या विद्यापीठासमोर असणारे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्याच्या धावपळीच्या ऑनलाईन युगात वाचन संस्कृती जपण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने प्रत्यन करणार असल्याचे सांगीतले. शिवाजी विद्यापीठाच्या नाव लौकिकासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी सध्याच्या आधुनिक युगात वाचन संस्कृती कमी होताना दिसत आहे. ही वाचन संस्कृती वाढवण्यासाठी सर्वांनी दर्जेदार पुस्तके, समृद्ध ग्रंथालये त्याचबरोबर वाचनासाठीचे प्रबोधन होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. एखादे पुस्तक आपल्या आयुष्यात काय बदल करू शकतात याचे उदाहरणासहित संदर्भ सांगून वाचन मनुष्याच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवू शकते असे मत व्यक्त केले. ज्या विद्यापीठात आपण शिकलात त्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून आपली नेमणूक झाली त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचे नाव लौकिक भारतात नक्कीच उंचावण्यासठी प्रयत्न कराल असा विश्वास जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी व्यक्त केला. यावेळी कुलगुरू यांनी राहूल चिकोडे यांच्या वाचन संदर्भ कौशल्याबद्दल व वाचन संस्कृती वाढवणयासाठीच्या प्रयत्नांचे कौतुक केले
Leave a Reply