भाजपा महिला मोर्चाच्यावतीने नवदुर्गांचा सन्मान

 

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महिला मोर्चाच्यावतीने नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा-या ९ महिलांना भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ उमाताई खापरे यांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्काराचे सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा, कोल्हापूर महिला मोर्चा प्रभारी सौ सुवर्णा पाटील, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा ज्योती जाधव, पिंपरी चिंचवड महिला पदाधिकारी सौ संजीवनी पांडे, सातारा जिल्हा उपाध्यक्षा सौ निर्मला पाटील, भाजपा महीला मोर्चा कोल्हापूर अध्यक्षा गायत्री राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ उमाताई खापरे यांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले व नवदुर्गा पुरस्कार प्राप्त महिलांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक करताना भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गायत्री राउत यांनी कोल्हापूर महिला मोर्चाच्या कार्याचा आढावा देत आजच्या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. कोल्हापूरात आदिशक्तीचा जागर सुरु असताना अशा कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करणे भाग्याची गोष्ट असल्याचे नमूद केले.
याप्रसंगी बोतलाना भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ उमाताई खापरे म्हणाल्या, आजची महिला ही समाजामध्ये आपले कर्तुत्व दाखवून उल्लेखनीय कामगिरी करत आहे. कोरोनासारख्या गंभीर परिस्थिती मध्ये महिलांनी आपले काम पार पाडत कठीण प्रसंगी आपली भूमिका सक्षमपणे निभावली आहे. या नवरात्रोत्सवाच्या निमित्याने यावेळी प्रदेश महिला मोर्चाच्यावतीने डॉक्टर, वकील, अंगणवाडी सेविका, बचत गट चालवणा-या महिला यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या महिलांचा सन्मान करण्याचे आयोजन केले असल्याचे नमूद केले. करवीर नगरीत यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव साजरा होऊ शकत नाही परंतु या पुरस्कारांच्या माध्यमातून महिलांच्या रूपाने नवदुर्गांचा सन्मान होत असल्याचे नमूद केले. महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता समाजामध्ये प्रबोधन करणे गरजेचे असून यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. महिलांचे प्रश्न सोडवण्याकरीता प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध प्रकोष्ठ तयार करणार असून यामाध्यमातून विविध क्षेत्रातील काम करणा-या महिलांचे समाजहितासाठी उपयुक्त असे संघटन करणार असल्याचे नमूद केले. यांनतर मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
भाजपा महिला आघाडीच्यावतीने सत्कार झालेल्या महिलांची नावे पुढील प्रमाणे : सौ सुनिता काळे (योग प्रशिक्षिका) अॅड.चारूलता चव्हाण, कु.ऐश्वर्या मुनीश्वर (सामाजिक कार्यकर्त्या) डॉ.चैताली कांबळे (अॅपल हॉस्पीटल कर्करोग तज्ञ) डॉ.प्रतिभा खरे, डॉ.मीना खंडेलवाल, डॉ.सुनिता देसाई, डॉ.श्रुती निप्पाणीकर (एम.डी.आयुर्वेद) सौ दिना चौगुले (AWS संभाजीनगर आगार) यांना मान्यवरांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी डॉ.सुनिता देसाई यांनी महिलांना प्रोत्साहन देणारी कविता सादर केली. त्याचबरोबर ७४ वर्षाच्या डॉ.प्रतिभा खरे यांनी आपल्या जीवनातील विविध प्रेरणादायी अनुभव सांगत महिलांनी आपले छंद जोपासण्याचे आवाहन केले. अॅपल हॉस्पीटलच्या डॉ.चैताली कांबळे यांनी ब्रेस्ट कॅन्सर विषयी महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जाधव यांनी केले. याप्रसंगी भारती जोशी, सुलभा मुजूमदार, रजनी भुर्के, प्रमोदिनी हार्डीकर, विद्या बनछोडे, विद्या म्हमाणे, आसावरी जुगदार, मंगला निप्पाणीकर, सुनीता सूर्यवंशी, स्वाती कदम, वैशाली पोतदार, कार्तिकी सातपुते, विजयमाला जाधव, शोभा कोळी, लता बर्गे, शुभांगी चितारी, राधिका कुलकर्णी, कविता पाटील, श्वेता कुलकर्णी आदींसह भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!