यकृतामध्ये  ट्युमर असलेल्या अडीच वर्षीय लहान मुलावर सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार

 
पुणे: यकृतामध्ये 15 सेंटीमीटर  ट्युमर असलेल्या एका अडीच वर्षीय लहान मुलावर सह्याद्रि हॉस्पिटल येथे यशस्वी उपचार करण्यात आले. एकीकडे संपूर्ण जग कोरोना महामारीविरूध्द लढत असताना दुसरीकडे या लहान मुलाच्या यकृतामध्ये 15 सेमी ट्युमर असल्याचे निदान झाले.त्याच्या आई-वडिलांना हे ऐकल्यावर धक्का बसला होता.आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांनी उपचाराची आशा देखील सोडून दिली होती.मात्र तीन महिन्यांनंतर पुढील उपचार घेण्यासाठी सह्याद्रि हॉस्पिटल पुणे येथे आले.
याबाबत माहिती देताना सह्याद्रि हॉस्पिटल्स मधील यकृत प्रत्यारोपण तज्ञ व हेड पेडियाट्रिक हेपॅटोलॉजिस्ट डॉ.स्नेहवर्धन पांडे म्हणाले की,हे कुटुंब माझ्याकडे मार्चच्या उत्तरार्धात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आले होते.त्याच्या आई-वडिलांना आपल्या मुलाची परिस्थिती पाहून धक्का बसला होता आणि उपचाराच्या खर्चासाठी पैसे नसल्याने हतबल झाले होते.मात्र मला खात्री होती की उपचार केल्यास त्यामध्ये चांगले परिणाम दिसू शकतील.फक्त त्यांना परवडत नाही म्हणून लहान मुलावर उपचार होऊ नये हे मला पटत नव्हते.आमच्या येथील सर्व कर्करोग आणि हेपॅटोबिलियरी तज्ञांची मदत घेऊन या मुलाच्या उपचाराची पुढची दिशा आखली गेली.कोणताही वेळ न घालवता आम्ही केमोथेरपी सुरू केली.दुसरीकडे विविध सामाजिक संस्थांकडे जाऊन मदतीसाठी आम्ही धाव घेतली. परिस्थिती चांगली नव्हती,कारण बहुतेक निधी कोरोनाविरूध्दच्या लढ्यासाठी वापरला जात होता.सह्याद्रि हॉस्पिटलमधील कर्करोगतज्ञ डॉ.तुषार पाटील म्हणाले की,हा ट्युमर उच्च जोखमीचा होता.म्हणून यामध्ये कुठलीही दिरंगाई न करणे महत्त्वाचे होते.त्याच्यावर केमोथेरपीचे उपचार सुरू करण्यात आले आणि प्रत्येक तीन आठवड्याला केमोथेरपीच्या चार सायकल्स देण्यात आल्या.या मुलाने खंबीरपणे उपचाराला सामोरे जात चांगला प्रतिसाद दिला व त्याच्यामध्ये उपचारांचे कुठलेही दुष्परिणाम (साईड इफेक्टस) दिसले नाहीत.यामुळे ट्युमरचा आकार 5 सेमी पर्यंत कमी झाला आणि अल्फा फेटोप्रोटीन या ट्युमर निर्मिती करणार्‍या घटकांचे प्रमाण 35 लाखवरून 6.6 लाखावर आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!