
मला विश्वासच बसत नाही की, आम्ही सोनी सबवरील मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा‘चे ५०० एपिसोड्स यशस्वीपूर्ण पूर्ण केले आहेत. सेटवर पहिल्यांदा आल्यानंतर मी नर्व्हस झालेलो तेमला आजही आठवते.पहिल्या दिवसापासूनच कलाकार, टीम व सेटवरील संपूर्ण वातावरण घराप्रमाणे खेळीमेळीचे होते. त्यामुळे आमच्यामध्ये त्वरित दृढ नाते निर्माण होण्यास मदत झाली, जे सरत्या दिवसांसह अधिकाधिक दृढ होत गेले. आज ५०० भव्य एपिसोड्सचे शूटिंग केल्यानंतर आम्ही अभिमानाने एकमेकांना सहकारी किंवा टीमपेक्षा एक कुटुंब म्हणून हाक मारतो.पाचशे एपिसोड्सची प्रबळ मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा‘ सुरूवातीपासून ते आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सोनी सबच्या चाहत्यांनी मालिकेमध्ये मी साकारलेल्या विविध भूमिकांवर प्रेम व पाठिंब्याचा वर्षाव केला आहे आणि याचे श्रेय उत्तम लेखनाला जाते. या प्रवासादरम्यान मी अलाद्दिनच्या रूपात विविध भूमिका साकारल्या आहेत. माझ्या मते, आम्ही साकारत असलेल्या भूमिका आपल्या दैनंदिन जीवनांशी निगडित आहेत, कारण या भूमिका आपल्याला स्थितीशी जुळवून घेण्याची आणि त्यानुसार वागण्याची शिकवण देतात.मला आनंद होत आहे की, आम्ही सातत्याने लक्षवेधक कथानक व अद्वितीय संकल्पना असलेले सीन्स सादर करत आलो आहेत. ज्यामुळेच आम्हाला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. माझी भूमिका उत्तमरित्या लिहिण्यात आली आहे. ही भूमिका प्रबळ, गोंडस व उत्साहवर्धक आहे, ज्याला आपण परिपूर्ण पॅकेज बोलू शकता.वैयक्तिक गोष्टींबाबत बोलायचे झाले तर ५०० एपिसोड्सचा प्रवास माझ्यासाठी रोमांचक प्रवास राहिला आहे. हा प्रवास लडाखला बाइक राइडप्रमाणे अविश्वसनीय राहिला आहे, जेथे लांबचा प्रवास शेवटी काहीतरी नयनरम्य ठिकाणी संपतो.
Leave a Reply