
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील उपनगरांचा नियोजनबध्द विकास करणेकरीता आपण कटीबध्द असून याची सुरवात रामानंदनगर येथून करत असल्याचे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत रामानंदनगर येथील ओपनस्पेस विकसीत या कामाच्या भूमीपुजन कार्यक्रमावेळी बोलताना केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील हे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना खासदार मंडलिक म्हणाले, संजय पाटील (कोलोलीकर) यांचे माध्यमातून रामानंदनगर व परिसरातील नागरीकांशी अतुट नाते निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. युवा आमदार ऋतुराज पाटील यांच्या कार्यशैलीचेही त्यांनी याप्रसंगी कौतुक केले. रामानंद नगर येथील ओपन स्पेस विकसीत व्हावा अशी मागणी स्थानिक नागरीकांची होती याकरीता संजय पाटील यांचेसह स्थानिक कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला असून या ओपन स्पेस करीता खासदार निधीमधून बारा लाख तीस हजार रु. मंजूर झाले असून यामध्ये जेष्ठ नागरीकांकरीता वॅाकिंग ट्रेक, ऑक्सिजन पार्क तसेच सभोवती कपौंड वॅाल बसविणे आदी कामे याठिकाणी होणार असल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली. आमदार ऋतुराज पाटील यांनी दक्षिण मधील विविध विकासकामांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील यांनी तर वैभव देसाई यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी ॲड.सुरेश कुराडे, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, नितीन पाटील, शेखर मंडलिक, सतिश भाले, धुलेंद्र पोवार, विश्वजीत कोळी, सुजित देसाई, संजय वाडकर, तुषार पाटील, सचिन कांबळे, गुरव मामा, विजय गुरव, संतोष जरग, के.ए.परब, हेमंत गुरव, संजय वाडकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply