गोवा विद्यापीठात छ.शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारण्याची संभाजी राजे छत्रपती यांची मागणी

 

पणजी : छत्रपती संभाजी राजे आणि मुख्यमंत्री गोवा यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली.यावेळी गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली. नवीन विद्यार्थी, अभ्यासक आणि इतिहासकारांना त्याचा लाभ होईल. यावर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राजेंना सांगितले की, आपली मागणी अगदी रास्त असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेऊ. हा विषय आजपर्यंत माझ्या लक्षात आला नव्हता. आपण जे म्हणता आहात ते, अगदी योग्य असून ही संकल्पना अंमलात आणली जाईल.
‘रायगड विकास प्राधिकरणाला,  गोवा सरकार ने पोर्तुगीज कागदपत्रे, पत्रव्यवहार आणि संदर्भग्रंथ याबाबत सहकार्य करण्याची विनंती केली. गोव्याचे पोर्तुगीज आणि मराठा सत्तांमध्ये नेहमी संघर्ष राहिला होता. व्यापारी संबंध देखील होते. त्यामुळे अनेक पत्रव्यवहार झाले होते. त्यातून रायगड संबंधातील काही नोंदी सापडतील का? हा प्रमुख उद्देश आहे. तसे थेट पुरावे सापडले तर, रायगड संवर्धन कार्यात त्याचा उपयोग होईल. असे संभाजीराजेंनी सांगितले. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,  की आमच्याकडे पोर्तुगीज आणि मराठी किंवा इंग्रजी जाणणारे लोक आहेत. त्यांच्या माध्यमातून प्राधिकरणाला अम्ही सर्व ती कागदपत्रे उपलब्ध करून देऊ. महाराज, आम्ही सुद्धा गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या अधिपत्याखालील किल्य्यांचे संवर्धन करत आहोत. अनेक ठिकाणी स्मारके उभी करण्यास सुरुवात केली आहे. किल्ले संवर्धन आणि जतन यामध्ये आपलेही योगदान मोठे आहे. आपल्या अनुभवाचा लाभ गोवा सरकार ला सुद्धा झाला तर आम्ही आनंदी असू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!