अकलूज परीसरात झी मराठीच्या “कारभारी लयभारीचे” चित्रीकरण सुरू

 

प्रतिनिधी: सध्या कोरनामुळे थांबलेले अर्थचक्र पुन्हा पुर्व पदावर येताना दिसत आहे, मात्र कोरनामुळे अनेकाच्यां रोजगाराच्या समस्या निर्माण झाल्याने अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. धैर्यशील मोहीते पाटील यांच्या प्रयत्नातून सोलापूर जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अकलूज व आजूबाजूच्या परिसरात झी मराठी च्या कारभारी लयभारी या मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले आहे पुढचे एक दीड वर्ष चित्रीकरण सुरू असणार आहे. या मुळे स्थानिक कलाकार व व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत.अकलूज हे सांस्कृतिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे, आनंदी गणेश, शिवसृष्टी किल्ला, अकलाई मंदीर, शिव-पिर्वती, सयाजीराजे वाॅटर पार्क इत्यादी पर्यटनाचे विविध लोकेशन चित्रीकरणासाठी सोयीचे आहेत यामुळे देखील अकलूज चित्रीकरणाच्या दृष्टीने कायम आकषिर्त राहीलेले आहे याचा व रोजगार निर्मितीचा विचार करून धैर्यशील मोहीते पाटील यांनी झी मराठीच्या कारभारी लयभारी नंती करून अकलूजला चित्रीकरण सुरू करण्यात आले.कारभारी लयभारी मालिकेचे सोशल डीस्टन्सिंगचे नियम पाळून चित्रीकरणाचे काम सुरू असून अकलूज व परिसरातील शंभर ते दीडशे नवोदित कलाकारांना काम करण्याची नामी संधी निर्मात्याने उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे अनेक युवक-युवतींना रोजगार मिळाला आहे तसेच पूर्ण चित्रीकरणाच्या संबधित व्यावसायातून कोट्यावधीची उलाढाल होणार आहे.तसेच चित्रीकरणाच्या सेट वरच्या कामासाठी स्पाॅट बाॅय, जेवण पुरवण्यासाठी केटर्स , कपडे पुरविणारे, लाॅन्ड्री , वाहने, ट्राॅली, जनरेटर, लाॅजिग, हाॅटेल, केशभुषा चित्रीकरणासाठी लागणारे साहित्य पुरवणारे, या संबधित क्षेत्रातील शेकडो व्यावसायिकांना रोजगार मिळत आहे लाॅकडाऊन नंतर विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्याची संधी या कारभारी लयभारीच्या माध्यमातून मिळाली आहे.मालिकेचे चित्रीकरण अकलूजला आणून आर्थिक संकटात सापडलेला व्यावसायाला चालना दिल्याबद्दल व्यावसायिक व कलाकारांनी धैर्यशील मोहीते पाटील यांचे आभार मानले व या पुढे सांस्कृतिक राजधानी असलेल्या अकलूजला चित्रपट सृष्टी निर्माण होण्या करीता पर्यंत करावे म्हणून मागणी केली.चित्रपट व मालिकेच्या चित्रीकरणाच्या माध्यमातून कोट्यावधी रूपायांची व्यावसायिक उलाढाल होत असते स्थानिकांना रोजगार निर्माण होत असतो नवोदित कलाकारांना संधी मिळत असती तर व्यापारी व्यावसायिकांचे अर्थच्रक फिरत असते कोरोनाच्या परिस्थिती मुळे मंदावलेले अर्थ चक्राला गती देण्यासाठी अकलूजला चित्रीकरण सुरू करावे म्हणून विनंती केली.धैर्यशील मोहीते पाटील यांनी त्यांच्या भागातील कलाकारांना लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून चित्रीकरण आमच्या अकलूजला सुरू करावे विनंती केली होती त्यांच्या सांगण्यावरून वरून आम्ही अकलूजला चित्रीकरण सुरू केले. सातारा वाई पेक्षा सुद्धा जास्त सुविधा अकलूजला मिळतात या पुढे देखील मालिका चित्रपटांचे शूटिंग अकलूजला करण्याचा आमचा मानस आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!