
कोल्हापूर: कागलमध्ये पोस्ट कोविड केअर सेंटरचे उद्घाटन झाले.यावेळी कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी व नामवंत फुफ्फुस रोग तज्ञ डॉ. अजय केणी यांनी मार्गदर्शन केले. आरटीओ चेक पोस्टच्या गोडाऊन क्रमांक चारमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कोरोना महामारीमध्ये संभाव्य धोका ओळखून घ्यावयाची खबरदारी, बाधित झाल्यास उपचार व कोरोनामुक्तीनंतर घ्यावयाची दक्षता या विषयावर ॲस्टर आधार हॉस्पिटलचे डॉ. अजय केनी यांचे व्याख्यान झाले.दरम्यान; कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांवर आवश्यक उपचार व त्यांच्या समुपदेशनासाठी कागल येथे पोस्ट कोवीड सेंटर सुरु करण्यात आले आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.कोरोना महामारीच्या संसर्गामध्ये अहोरात्र, अविरत व निस्पृह सेवा देणारे ॲस्टर आधार हॉस्पिटलचे डॉ. अजय केनी यांनी संपूर्ण कोल्हापूर जिल्हाभर कोरोना नंतरचे जीवन या विषयावर व्याख्याने देऊन जनजागृती करण्याचा संकल्प केला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांची व्याख्याने झाली असून त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर कागलमध्ये त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले होते. तरी कोरोनामुक्त झालेले रुग्ण तसेच इतर सर्वच नागरिकांनी त्यांच्या या व्याख्यानाचा लाभ घेतला. या व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी आजी माजी नगराध्यक्ष ,उपनगराध्यक्ष सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक व नगरसेवीका, नगरपरिषदेचे अधिकारी, आरोग्य विभागाचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply