भागीरथी महिला संस्थेच्यावतीने दिवाळी महोत्सवाचं आयोजन

 

कोल्हापूर:महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं ६ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत कोल्हापुरातील कावळा नाका इथल्या कार्यालयात दिवाळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवात महिला बचत गटांचे स्टॉल्स उभारण्यात येणार असून, ग्राहकांना खरेदीचा तर मुलांसाठी फनफेअर आणि फनी गेम्सचा आनंद लुटता येणार आहे.
   धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था गेली १५ वर्षे महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत आहे. संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी, संस्थेच्या माध्यमातून, महिलांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देवून त्यांना आत्मनिर्भर बनवलं आहे. आतापर्यंत हजारो महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेवून, व्यवसाय सुरू केले आहेत. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं ६ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत कोल्हापुरातील कावळा नाका इथल्या संस्थेच्या कार्यालयात दिवाळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या दिवाळी महोत्सवात महिला बचत गटांचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये तोरण, आकाश दिवे, पणत्या, साबण, उटणे, परफ्युम, सिल्क साडी, कॉटन साडी, ड्रेस मटेरियल, कुर्तीज, गाऊन, लहान आणि मोठ्यांसाठी रेडिमेड कपडे, होम डेकोर, बेडशिट, पडदे, रजई, तर दिवाळीसाठी खमंग फराळ, तसंच चटणी, लोणचे-पापड, रांगोळी, पर्स, फॅन्सी पाऊच, म्युरल्स, डेकोरेटिव्ह शो पीस, इमिटेशन ज्वेलरी यांचा समावेश आहे. या महोत्सवात आकर्षक बक्षिसंही ठेवण्यात आली आहेत. शिवाय मुलांसाठी मजेदार फन फेअर आणि फनी गेम्स, दररोज मनोरंजनात्मक खेळाचा आनंदही घेता येणार आहे. तसंच महिलांसाठी विविध स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत. तरी या महोत्सवाचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असं आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!