
कोल्हापूर: दिवाळी पूर्वसंध्येला शनिवार – रविवार महाद्वार रोडवर प्रचंड गर्दी होते.रस्त्याच्या मध्ये व्यवसाय करायचा का नाही करायचा ? याविषयी आठ दिवस व्यापारी व फेरीवाले यांच्यात वाद चालू होता.पण शनिवारी अचानक फेरीवाल्यांनी रस्त्यात ठाण मांडून व्यवसाय सुरू केला.सगळे सुरळीत चालू झाले असे वाटत असताना अचानक रविवारी सकाळी सहा ववाजता महापालिका अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात रस्त्याच्या मधोमध बसलेल्या शेकडो फेरीवाल्यांचे स्टॉल ,माल जप्त करण्यास सुरुवात केली.त्यानंतर प्रचंड वादावादी झाली.काही केल्या हा वाद मिटेना 11 वाजण्याच्या सुमारास काही नगरसेवकांनीही यात मध्यस्थी केली ,पण फेरीवाले आपल्या मागणीवर ठाम राहिले.वातावरण सतत तंग झाले.बजरंग दल शहर प्रमुख महेश उरसाल यांनी मध्यस्थी करत चर्चा केली.दरम्यान त्यातील एका महिलेने सांगितले की आम्ही 20 % व्याजाने पैसे काढून माल भरलाय ,तुम्ही आता काहीतरी तोडगा काढा अन्यथा मी इथं स्वता:वर रॉकेल टाकून पेटवून घेणार.असं सांगितले. प
यादरम्यान शहर अभियंता नेत्रदीपक सरनोबत त्यांच्याशी आणि अतिक्रमण प्रमुख पंडित पोवार यांच्याशी चर्चा करून ताराबाई रोड ते सरस्वती टॉकीज पार्किंग पर्यंत रस्त्याचा सर्व्हे केला आणि त्यांना मित्रप्रेम ते तटाकडील तालीम चौकपर्यंत दूतर्फा तसेच मधोमध फेरीवाल्याना बसू द्यावे ,कपिलतीर्थ मार्केट पार्किंग ,सरस्वती टॉकीज पार्किंग येथे फेरीवाल्यांना व्यवसाय जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली.त्यासोबत सकाळी जप्त केलेला माल,हातगाडी पुन्हा दंड न भरता तात्काळ ताब्यात द्यावा.त्यावर त्यांनी चर्चा करून मागणी मान्य केली.
त्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 1:00 वाजेपर्यंत चालू असणारा फेरीवाले-दुकानदार-प्रशासन यांच्या गंभीर संघर्षावर तोडगा काढण्यात यश मिळालं.
Leave a Reply