
कोल्हापूर: छत्रपती शाहू महाराजांचे जनक घराणे म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजर्षि शाहूंच्या जनपंचायत संकल्पनेवर आधारित शिवार संवाद दौऱ्याचा आज शुभारंभ करण्यात आला. या जिल्हा दौऱ्याची सुरूवात करवीर तालुक्यातील चिंचवाड गावातून भाजपचे जिल्हा अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी केली. यानंतर तालुक्यातील विविध गावच्या शेतकऱ्यांच्या व्यथा थेट बांधावर जाऊन त्यांनी समजावून घेतल्या.
शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची व शासनाने जाहीर केलेली मदत द्या, अशी मागणी यावेळी केली. तर शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वचनही शेतकरी बांधवांना दिले.सद्या शेतकरी चोहोबाजूंनी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्याला शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान सात महिने उलटले तरी अजून मिळालेले नाही. दोन लाखांच्या आतील थकबाकीदार कर्जदार काही शेतकरीही कर्जमाफीपासून वंचित आहेत. तसेच दोन लाखाच्या वरील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत शासन कोणताही शब्द काढण्यास तयार नाही. शासनाने केवळ घोषणा केल्या आहेत. शासनाने दिलेला शब्द पाळावा. शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन संवाद साधल्यामुळे या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. यावेळी अनेक मान्यवरांसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
Leave a Reply