
कोल्हापूर: आमदार चंद्रकांत जाधव साहेब यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी आज साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करता गोरगरिबांना मदत करा असे आवाहन आमदार जाधव यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत, वाढदिवसानिमित्त शहरातील पाच शिवभोजन थाळी केंद्रावरून गरजूना मोफत जेवण देण्यात आले. महालक्ष्मी अन्नछ्त्र, गंगावेश, सावित्रीबाई फूले रुग्णालय, मार्केट यार्ड, जिल्हाधिकारी कार्यालयसमोर येथील शिवभोजन केंद्रावरून गरजूना मोफत जेवण देण्यात आले. या उपक्रमाची सुरवात महापालिकेचे स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांच्या हस्ते झाली. या उपक्रमाचे नियोजन अभिलाष चव्हाण, दिपक चोरगे, दिग्वीजय मळगे, युवराज कुरणे, सचिन पायमल, संदिप पाटील, नितीन पाटील, राजू साठे यांनी केले.
सम्राटनगर फ्रेंडस सर्कलच्यावतीने ( झाडावरचा गणपती) मातोश्री वृध्दाश्रम, माऊली केअर सेंटर, शेंडापार्क व करूणालय बालगृह, शिये येथे फळे वाटप करण्यात आली. याचे नियोजन कपील मोहिते, रणधीर माने, अनिकेत सावंत, देवेंद्र रेडेकर, संदीप पोवार, ओंकार जाधव, रोहन पवार, केदार पाटील, तेजराज माने यांनी केले.
Leave a Reply