शिवसेनेचा महापौर करण्यासाठी जोमाने कामाला लागा :राजेश क्षीरसागर

 

कोल्हापूर : जय- पराजय हा निवडणुकीचा भाग आहे. अपयशाने खचून न जाता पुन्हा न नव्या दमाने सुरवात करण्याची शिकवण शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिली असून, गेल्या दोन पदवीधर आणि महापालिका निवडणुकीचा अनुभव सार्थकी लावण्याची संधी येत्या निवडणुकीत मिळणार आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी ठाम उभे राहून, प्रसंगी त्यागाची भूमिका घेवून पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या घरोघरी प्रचार करावा. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्ष आदेशाचे तंतोतत पालन करावेच यासह महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर करण्यासाठी जोमाने कामाला लागण्याच्या सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिल्या. पदवीधर आणि महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचा पदाधिकारी निर्धार मेळावा आज गुरुकृपा सांस्कृतिक भवन येथे पार पडला.
मेळाव्याची सुरवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. भगवे स्कार्फ परिधान केलेले शिवसैनिक, परिसरात झेंडे आदीद्वारे शिवसेनेने आज एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद”, “शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे, नामदार आदित्यजी ठाकरे यांचा विजय असो” अशा घोषनानी परिसर दणाणून सोडला.
मेळाव्याच्या प्रारंभी कोरोना महामारीच्या काळात निधन झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर कोरोना परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेबांचे, राज्य शासनातील लोकप्रतिनिधी, कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, पत्रकार, सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स व सर्वच कोव्हीड योद्ध्यांचे अभिनंदनाचा ठराव ठराव करण्यात आला. त्यास शिवसैनिकांनी हात उंच करून पाठींबा दिला. त्याचबरोबर परिवहन सभापती पदावर निवड झाल्याबद्दल श्री.चंद्रकांत सूर्यवंशी यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, विधानसभा निवडणुकीच्या निकालास १ वर्षाचा कालावधी उमटला. जय- पराजयाचा विचार न करता शिवसैनिकांच्या साथीने अविरत समाजकार्य सुरूच ठेवले आहे. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात कोरोना परिस्थिती सांभाळण्यात सरकार यशस्वी ठरले असून, राज्यास प्रगतीपथावर नेण्याचे काम शिवसेनेने करून दाखवले आहे. शिवसेनेचा इतिहास त्यागाचा असून त्यांचे ज्वलंत उदाहरण नूतन परिवहन सभापतींची निवड आहे. शिवसेनेच्या माजी परिवहन सभापती सौ.प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केलेल्या त्यागाबद्दल त्यांना पुढील काळात निश्चितच न्याय मिळवून दिला जाईल.
गेल्या दोन्ही पदवीधर निवडणुकीच्या विजयात शिवसेनेचा मोलाचा वाटा आहे. गत निवडणुकीत शिवसेनेकडून विक्रमी झालेली पदवीधर मतदार नोंदणीच्या आधारावर शिवसैनिकांनी मतदारांपर्यंत पोहचावे. पक्ष आदेशांप्रमाणे दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून त्यांना विजयी करण्यात मोलाचे योगदान द्यावे.
गेल्या दोन्ही महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे पंचवीस – तीस उमेदवार थोडक्या मतांनी पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यागाची भूमिका ठेवून पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रामाणिक प्रचार करून त्यांना विजयी करावं. याच त्यागाच्या भूमिकेतून शिवसेनेचा महापौर झालेला आपल्याला बघायला मिळेल. कोणालाही दोष न देता सकारात्मक कामातून पुढे जावूया. गेल्या दहा वर्षात उभा केलेल्या विकास कामांच्या डोंगराची शिदोरी घेवून मतदारांपर्यंत पोहचा, मतदारांना शिवसेनेच्या कामाचे महत्त्व पटवून द्या आणि आगामी निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा अशा सूचना केल्या.
यावेळी बोलताना शिवसेना शहरप्रमुख श्री.रविकिरण इंगवले यांनी, वयाच्या २३ व्या वर्षापासून समाज कार्याचा वसा घेवून कार्यरत आहे. त्याग कसा असावा हे शिवसेनेत शिकायला मिळत. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केल्यानेच सलग चार वेळा जनतेने नगरसेवक पदी निवडून दिले. इच्छुक उमेदवारांनी जिद्दीने, तळमळीने काम करावे, नक्कीच जनता काम करणाऱ्याच्या पाठीशी ठाम उभी राहते. कोणालाही कमी न लेखता श्री.राजेश क्षीरसागर साहेबांनी केलेल्या विकास कामाच्या बळावर मतदारांपर्यंत पोहचावे. शिवसेनेकडे सत्ता दिल्यास शहराचे प्रलंबित प्रश्न शिवसेना मार्गी लावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना शिवसेना गटनेते राहुल चव्हाण यांनी, रक्तात शिवसेना असल्याचे सांगत, पक्ष आदेशास बांधील आहोत. नगरसेवक सामान्य कार्यकर्त्याला पहिल्या संधीतच परिवहन सभापती सारख्या पदावर काम करण्याची संधी शिवसेनेत मिळते. शिवसेना नगरसेवक म्हणून पक्षास अभिप्रेत असणारे काम केले असल्याचे सांगत, आगामी निवडणुकीत ताकदीने उतरू, असे सांगितले.यावेळी बोलताना संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी, शिवसेना ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढविणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच आरक्षणाच्या अनुषंगाने दाखले तयार ठेवावीत. प्रभागातील शिवसैनिकांनी नाराजी न बाळगता एकदिलाने एकाच उमेदवाराची मागणी करावी. पक्ष आदेशाचे तंतोतंत पालन करावे, अशा सूचना केल्या.
यावेळी नगरसेवक नियाज खान यांनी आभार प्रदर्शन करताना, श्री.राजेश क्षीरसागर साहेबांनी गेल्या ५ वर्षात निधीची कमतरता भासू न दिल्यानेच प्रभागाचा विकास करता आला असल्याचे सांगत शिवसेनेने सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठे केल्याची भावना व्यक्त केली. मेळाव्याचे प्रास्ताविक अंकुश निपाणीकर यांनी केले. या मेळाव्यास शिवसेना नगरसेवक अभिजित चव्हाण, शिवसेना नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, प्रवीण पूजारी, दीपक गौड, जयवंत हारुगले, रघुनाथ टिपुगडे, रविभाऊ चौगुले, अरुण सावंत, दिनकर उलपे, सौ.मंगलताई साळोखे, योगेश चौगले, अविनाश कामते, चेतन शिंदे, पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे, यांच्यासह शहर शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!