
कोल्हापूर : सध्याच्या युगात दूरध्वनी आणि इंटरनेट सेवेला असाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे दूरध्वनी सेवेसंदर्भात ज्या काही अडचणी आहेत त्याचा सर्व्हे करून येत्या पंधरा दिवसांमध्ये अहवाल देण्याच्या सूचना खासदार संजय मंडलिक यांनी बीएसएनएल’सह इतर खाजगी सेवा पुरवणाऱ्या दूरध्वनी कंपन्याना केली. आज या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार मंडलिक बोलत होते.कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज, गगनबावडा आदी तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये बीएसएनएल सेवेबरोबरच इतर खाजगी दूरध्वनी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या सेवेचा बोजवारा उडाला आहे. अनेक वेळा नेटवर्क गायब होणे, याशिवाय इंटरनेटला स्पीड नसणे अशा बाबी वारंवार उद्भवत आहेत. अनेक वेळा तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज खासदार संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली दूरध्वनी कंपन्यांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती अभिजीत तायशेटे, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अभय देसाई, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत बोलताना खासदार मंडलिक यांनी, दूरध्वनी सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना कोणत्या अडचणी आहेत, याशिवाय ग्रामीण भागात नेमक्या काय समस्या आहेत याची माहिती अधिकाऱ्याकडून घेतली. रेंज नसलेकारणाने एका फोन वर होणाऱ्या कामासाठी पुर्ण दिवस वाया जातो, कॅाल ड्रोप होणे, कोविड महामारीमुळे सध्या शिक्षण ऑानलाईन पध्दतीने सुरु असून मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या वर्कर्सचे वर्क फॅार्म होम सुरु आहे. या बैठकीत खाजगी कंपन्यांकडून देखील त्यांचे असणारे मोबाईल टावर्स आणि ग्रामीण भागामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा मध्ये येणाऱ्या अडचणी याची माहिती त्यांनी घेतली. परिणामी ज्या- ज्या समस्या आणि अडचणीआहेत या संदर्भात बीएसएनएलच्या अधिकारी आणि खासगी दूरध्वनी सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे करून त्याचा संयुक्त अहवाल येत्या पंधरा दिवसात देण्याच्या सुचना खासदार मंडलिक यांनी या बैठकीत केल्या. काही ठिकाणी नवीन मोबाईल टावर उभारणे गरजेचे आहेत. मात्र काही वेळा जागेची अडचण तसच वनविभागाचे नियम आणि केबल टाकण्यासाठी करावी लागणारी रस्त्यांची खुद्दाई आदी समस्या असल्याच बीएसएनएलचे मुख्य महाप्रबंधक संजयकुमार चौधरी यांनी सांगितले. यावर बीएसएनएलचे अधिकारी आणि इतर खासगी दूरध्वनी सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आणि खासदार संजय मंडलिक यांनी संयुक्त पाहणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याशिवाय पाहणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत सात डिसेंबरला वनविभाग त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्व अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दरम्यान मोबाईल टावर उभे करण्यासंदर्भात कंपन्या कधी जाहिरात देत नसतात त्यामुळे लोकांनी अशा खोट्या जाहिरातींना बळी पडू नये असे आवाहनही यावेळी खासदार मंडलिक यांनी केलं. यावेळी आमदार प्रकाश आबीटकर यांनी राधानगरी आणि आजरा तालुक्यामध्ये दूरध्वनी सेवेचा बोजवारा उडत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. तर आमदार राजेश पाटील यांनी, माणसांशी माणस जोडणार नात अशी ओळख असणाऱ्या दूरध्वनी सेवेचा बोजवारा उडत असल्याने ग्राहकांसोबतच बँका, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली असल्याच सांगितले. या बैठकीला बीएसएनएलचे उपमुख्य महाप्रबंधक शिवराम कुलकर्णी, आरएफओ माळी, मंडल अभियंता स्नेहा विचारे, यांच्यासह जीओचे आकाश सावंत, एअरटेलचे उज्वल जावळेकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply