उद्या  ‘आप’चा महापालिकेवर पंचनामा मोर्चा

 

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सभागृहाचा कार्यकाळ येत्या 15 नोव्हेंबरला पूर्ण होत आहे. मागील निवडणुकीत लोकप्रतिनिधींकडून अनेक आश्वासने देण्यात आली. निवडून आल्यानंतर शहराच्या विकासासाठी प्रत्यक्षात काय काम केले याचा पंचनामा होणे गरजेचे आहे.शहरातील खड्ड्यांनी नागरिक त्रासलेले आहेत. घरफाळा घोटाळ्याची व्याप्ती कोटींमध्ये आहे. अमृत योजना, नगरोथान योजनेचे काम कासवाच्या गतीने सुरू आहे. थेट पाईपलाईनमध्ये कोण मलई खात आहे याचा पंचनामा होणे गरजेचे आहे. ऐन मोक्याच्या ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या शाळा बंद पडत चालल्या असून त्या खाजगी लोकांच्या घशात घालण्याचा डाव रचला जात आहे. पदांची खांडोळी करत ढपलेबाज कारभाराला खतपाणी घालणाऱ्या नेत्यांनी यावर कधीच वचक ठेवण्याचा प्रयत्न केला नसल्यामुळे महापालिकेचा ‘पंचनामा’ होणे आवश्यक आहे.या मोर्चासाठी ‘आप’ने जोरदार तयारी सुरू केली आहे. शहरात जागोजागी मोर्चाचे बॅनर लागले आहेत. मोर्चाच्या प्रचारासाठी पार्टीच्या वतीने रिक्षा फिरवण्यात येत आहेत. तसेच सोशल मीडियावर वातावरण तयार करण्यासाठी शहरातील समस्यांचे वास्तव दाखवणारे पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. अनेक प्रभागातील नागरिक पार्टीशी संपर्क साधून आपल्या समस्या मांडत आहेत.मागील 5 वर्षांच्या कारभाराचा पंचनामा करण्याची मागणी घेऊन आम आदमी पार्टीने उद्या ‘पंचनामा मोर्चा’ आयोजित केला गेला आहे. या मोर्चाची सुरुवात सकाळी 11:00 वा. दसरा चौक येथून सुरू होणार असून तो सी पी आर मार्गे महापालिकेवर धडकणार आहे. शहरातील विविध प्रभागांमधून नागरिक या मोर्चात आपले प्रश्न घेऊन पंचनामा करण्याची मागणी करण्यासाठी सहभागी होणार आहेत.पत्रकार परिषदेला ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, संघटनमंत्री सुरज सुर्वे, महिला शहराध्यक्षा अमरजा पाटील, युवा शहराध्यक्ष मोईन मोकाशी उपस्थित होते.

कळावे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!