
नाशिक: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री असताना राज्यात विनाअनुदान तत्त्वावर वैद्यकीय महाविद्यालय व अभियांत्रिकी महाविद्यालय परवानगी देऊन शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडून आणली. त्यामुळे या थोर नेत्याचे नाव नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस यशवंत हाप्पे यांनी केली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना त्यांनी पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, वसंतदादा पाटील यांचा जयंतीदिनी हा सहकार दिन म्हणून शासनातर्फे साजरा करण्यात येत होता. मध्यंतरीच्या काळात त्यात खंड पडला आहे, तो परत सुरू करावा, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
Leave a Reply