
कोल्हापूर:येथील पांजरपोळ संस्थेला आज साडेचार टन पशुखाद्याची मदत करण्यात आली.कांतिलाल गुलाबचंद ओसवाल (केजी), विशाल बोंगाळे, हितेश गुलाबचंद राठोड, योगेश मांडरेकर, दौलत घाटगे यांच्या वतीने ही मदत राजाराम पोलिस ठाण्याचे निरीक्षक सीताराम डुबल, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश देसाई यांच्या हस्ते देण्यात आली. संस्थेच्या वतीने डॉ. राजकुमार बागल, संतोष देसाई आणि वैशाली पिसे यांनी याचा स्वीकार केला. यावेळी पोलिस निरीक्षक श्री. डुबल यांचा श्री. ओसवाल यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.दरम्यान, या संदर्भात श्री. ओसवाल यांनी सांगितले की, मानवता धर्मातून पांजरपोळ संस्थेला मदत करण्यात आली. गाय, बैल, म्हैस अशा विविध प्रकारच्या ३०० जनावरांना एक घास या भावनेतून केलेल्या मदतीमध्ये चार टन ७०० किलो पशुखाद्य आहे. त्यामध्ये मका, कोंडा, मका चुनी, सरकी पेंड, सूर्यफूल पेंड आणि शेंग पेंडेचा समावेश आहे.
Leave a Reply