कोल्हापूर : यशस्वी २७ वर्षापुर्वी मेंदुच्या टी.बी.च्या आजारामुळे कराव्या लागलेल्या व्ही .पी .शंट सर्जरी नंतर आतापर्यंत सर्वसामान्य आयुष्य जगणा – या सिंधुन तीला ३३ वर्षाच्या युवकाला अचानक पुन्हा उलटी येणे , डोके दुखणे , गरगरल्यासारखे वाटणे , डोळ्यातून पाणी येणे , अधुक दिसणे आणि चालताना वारंवार तोल जाणे अशा प्रकारची लक्षणे दिसु लागली . जवळच्याच रूग्णालयात तपासणी केली असता पूर्वी बसविलेला व्ही . पी .शंट कार्य करत नसल्याचे आणि मेंदुमध्ये पुन्हा एकदा पाणी वाढून त्याच्या दबावामुळे सदरची लक्षणे जाणवत असल्याचे निदान झाले . त्यामुळे पूर्वीचा शंट काढून नविन शट वसवणे जरूरी असल्याचे निश्चित करून सप्टेंबर २०२० मध्ये सदरच्या रूग्णावर दोन वेळेस शंट बसविण्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या . मात्र दोनही वेळेस हे शंट कार्य करत नसल्याचे रूग्णाला होणा – या त्याच त्या त्रासामुळे सिध्द झाले . अशावेळेस सदरच्या रूग्णाचे नातेवाईक ‘ एक्स्पर्ट अॅडव्हाईस ‘ घेण्यासाठी न्युरोसर्जन डॉ . कौस्तुभ वाईकर यांचेकडे आले असता त्यांनी या रुग्णाच्या लक्षणांचे अचुक निदान करून योग्य मार्गदर्शन केले त्यांच्या अनुभवानुसार ब – याचवेळेस खुपच मोठ्या प्रमाणात मेंदूत तयार होणा – या पाण्याच्या प्रेशरमुळे अथवा पाण्यातील काही घटकांमुळे नेहमीचे साधे व्ही . पी.शंट वारंवार ब्लॉक होण्याची शक्यता काही दुर्मिळ उदाहरणांमध्ये खुपच असते . साहजिकच यामूळे रूग्णाला पुन्हापुन्हा या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागते . हे टाळण्यासठी सध्याच्या प्रात संशोधनानुसार ‘ प्रोगामेलात शंट ‘ या प्रकारचा शंट बसविण्याची शस्त्रक्रिया केल्यास या रूग्णाला नेमका फायदा होईल असा विश्वास डॉ . कौस्तुभ वाईकर यांनी रूग्णाला दिला . ‘ प्रोगामेबल शंट ‘ हा डिव्हाईस , हा नावाप्रमाणेच कार्य करतो . रूग्णाच्या मेंदुमध्ये ज्या प्रमाणात अतिरिक्त पाण्याची निर्मिती होते त्या प्रमाणातच त्या पाण्याचे निर्गमन करण्याचे प्रमाण निश्चित केले असता पाण्याचा विसर्ग एका निश्चित प्रमाणात आणि एकाच दिशेने होत राहातो . मेंदूमधील पाण्याचे प्रेशर कमी – जास्त झाले असता पाण्याचा प्रवाह चुकिच्या दिशेने फिरण्याची शक्यता देखील अजिबात मावळते आणि शंट वारंवार ब्लॉक होण्यापासून सुटका मिळते . रूग्ण व त्याचे नातेवाईक यांनी ठेवलेल्या दृढ विश्वासामुळे आणि न्युरो – एन्डोस्कोपीच्या अचुक तंत्रज्ञानामुळे ही दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपल्याला बळ मिळाल्याचे सुप्रसिध्द न्युरोसर्जन डॉ . कौस्तुभ वाईकर यांनी सांगितले .
Leave a Reply