ग्रीस देशाची डेअरीमधील नाविन्यता चोखंदळ खवैय्यांसाठी भारतात प्रथमच कोल्हापुरमध्ये

 

कोल्हापूर: भारताच्या बाजारपेठेत एक नाविन्याची , विश्वासाची दर्जेदार परंपरा सुरू होत आहे . आपल्या दर्जेदार खाद्य उत्पादन , खाद्य संस्कृती , दूध आणि दुग्धपदार्थासाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या ग्रीस देशाचे , संस्कृतीचे आईस्क्रीम , पुडींग , डेझर्टस् , स्नॅक्स आता भारतात उपलब्ध होत आहेत . ग्रीस येथील उद्योजक आणि योगर्ट तज्ज्ञ जॉर्जिअस सिरीनॉअस , अॅथलांसिअस कौतुहान्स , निकोलस कौकीघास या तीन ध्येयवादी उद्योजकांनी ‘ ग्रीसानीया ‘ या कंपनीची सुरूवात केली . भारतामध्ये श्री . सत्यजीत पाटणकर आणि दत्तात्रय शिळीमकर हे या कंपनीचे संचालक आहेत . युरोपीय देशातील योगर्ट , चीज , आईस्क्रीम्स , पुडींग हे केवळ खाण्याची , पोट भरण्याची गोष्ट नसून उच्च अभिरूची , जागतिक दर्जा , सातत्य , चवीतील नाविन्य याचसोबत स्वच्छता , आरोग्य , कॅलरीजचे प्रमाण , शुद्धता याचा सदैव आग्रह धरते . म्हणूनच युरोपच्या बाजारपेठेतून आता ही उत्पादन शृंखला भारतीय खाद्य संस्कृतीसोबत मैत्री , नाविन्यता आणि खाद्यपरंपरा जपत , भ्रमण करत भारतात दाखल झालेली आहे . ग्रीक योगर्ट म्हणजे सर्वोच्च स्वाद . ग्रीक्स सॉस म्हणजे युरोपातील रसिकांचे हृदय जिंकणारा सॉस आणि ग्रीक आईस्क्रिम्स म्हणजे शुद्ध , निर्भेळ चवीचा अतीव आनंद ! अनेक वर्षाची ही खाद्यपरंपरा पिढ्यान्पिढ्यांनी जपली आहे . आधुनिक मशिन्स , तंत्रज्ञान , कौशल्य आणि तज्ज्ञांनी एकत्र ‘ ग्रीसानीया ‘ उत्पादने जागतिक मानांकनाच्या नियमांना अनुसरून निर्माण केली आहेत , काय असेल ग्रीसानीया ? आईस्क्रिमचे निरनिराळे फ्लेवर्स , आईस्क्रिमलाच पर्याय ठरणारे योगर्ट , व्हेज पुडींग सॉसेस , मिल्क क्रीम पासून बनविलेली आरोग्यदायी उत्पादने , ‘ Make your own Ice – cream ‘ या कल्पनेला प्रत्यक्षात आणणारे ‘ ग्रीसानीया ‘ ! स्वत : च आईस्क्रिम बनविण्याचा अनुभव – सोबत फ्लेवर्स आणि ग्रीसानीयाचे तज्ज्ञ ! प्रत्येक आठवड्याला बदलणारे फ्लेवर्स- नाविन्यपूर्ण । घरातील पार्टी , गेट – टुगेदर , आतिथ्य यासाठी ग्रीसानीया होम डिलीव्हरी देईल . परदेशी तंत्रज्ञान असूनही योग्य दर , देखणी अंतर्गत सजावट जी ग्रीस संस्कृतीची ओळख असेल . कुशल कर्मचारी , मोठी जागा , निवांतपणा ही या सेंटरची वैशिष्ट्ये असतील ग्रीक पुडींग , ताझिकी डीप , अरिआनी , प्रोटीन आइस्क्रिम , आरोग्यास अपायकारक नसणारे लो – कॅलरीज आईस्क्रिम , ग्रीक ब्रेकफास्ट अशा अनेक पदार्थासह एक नवी चव ग्राहकांसाठी उपलब्ध आहे . उत्पादन , गुणवत्ता , दर्जा , व्यवस्थापन याचसोबत ‘ प्रत्यक्ष भारतात उत्पादन ‘ ही ताजेपणाची खात्री असेल . ग्रीकमधील तज्ज्ञ , कुशल , प्रशिक्षित , कल्पक कर्मचारी भारतीय ग्राहकांसाठी येथेच उत्पादन , निर्मिती करतील . ग्रीसानीया – एक आनंदी , अद्भुत , गुणवत्तेचं जग . जिथं आईस्क्रिम असेल – आनंदाच , योगर्ट असेल – नव्या उत्साहाचं . मैत्रीपूर्ण वातावरणात , आधुनिक सेवेचे हे ग्रीसानीया बदलत्या भारताचं नवं केंद्र असेल . जागतिकीकरणाच्या बदलात संस्कृती , प्रेम , नाविन्य टिकवणारं असेल . या पत्रकार परिषदेता जॉर्जिअस सिरीनॉअस , अॅथलांसिअस कौतुहान्स , निकोलस कौकीघास , श्री.सत्यजीत पाटणकर , श्री . दत्तात्रय शिळीमकर व श्री . विक्रांत शिळीमकर उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!