
कोल्हापूर : खासदार संजय मंडलिक यांनी अल्पावधीमध्ये उद्योग वाढीसाठी केलेल्या योगदानाबद्दल स्मॅक-शिरोलीचे चे अध्यक्ष श्री अतुल पाटील यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात असून यावेळी उपाध्यक्ष श्री दीपक पाटील आयटीआय चेअरमन राजू पाटील, क्लस्टर चेअरमन निरज झंवर, तसेच कोल्हापूर फाउंड्री इंजिनिअरिंग क्लस्टर चेअरमन सचिन पाटील आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक विज्ञानंद मुंढे हे प्रमुख उपस्थित होते.यावेळी बोलताना खासदार मंडलिक म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी उद्योगाचा पाया रचला त्यामुळेच पुढील काळामध्ये श्री महादबा मिस्त्री, श्री केशवराव जाधव, श्री राम मेनन साहेब, श्री बापूसाहेब जाधव आदींनी उद्योगाच्या क्षेत्रांमध्ये असामान्य अशी कामगिरी केली आहे. या कर्तृत्वान पिढीचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आजची नवीन तरुण पिढी सुद्धा हा उद्योजकतेचा वारसा अत्यंत सक्षमपणे पुढे चालवत आहे याबाबत मला मनापासून आनंद होत आहे. मे.कोल्हापूर फाउंड्री आणि इंजिनिअरिंग प्लास्टरच्यावतीने शिरोली तसेच गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहती मध्ये वेस्ट स्ँड रिकलेमेशन प्लांट अतिशय उत्तम प्रकारे कार्यान्वित आहे . नैसर्गिक साधन सामग्रीला पर्याय म्हणून या वाळूची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळेच या सध्याच्या प्रकल्पांची क्षमता दुप्पट करण्याची गरज निर्माण झाली आहे व व तशी मागणी याबाबत केंद्र शासनाकडे केली आहे. या मागणीची पूर्तता करण्यासाठी माझ्या परीने सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही खासदार मंडलिक यांनी दिली. तसेच स्मॅकच्या वतीने अतिशय उत्तमपणे चालवण्यात येणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कौशल्य विकास अंतर्गत केंद्र शासनाच्या योजना मंजूर करण्याकरिता सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन खासदार मंडलिक यांनी यावेळी दिले.राज्य कामगार विमा योजनेच्या दवाखान्यासंदर्भात माहिती देताना खासदार मंडलिक म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात चार औद्योगिक वसाहतींमध्ये ESICचे दवाखाने मंजूर झाले असून ‘ आरोग्य आपल्या दारी ‘ या संकप्लनेतून औद्योगिक वसाहतींमध्ये राज्य कर्मचारी विमा योजनेचा दवाखाना असावा अशी माझी संकल्पना होती. त्यानुसार ईएसआयसी कडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी औद्योगिक कार्यक्षेत्रामध्ये ESIC चे चार ओपीडी दवाखाने मंजूर झाले आहेत. यामुळे कर्मचारी व त्यांचेवर अवलंबून असणाऱ्या कुटूंबावर तत्काळ उपचार होवून त्यांचा वेळ वाचणार आहे. स्मॅकने मागणी केल्यानुसार हा दवाखाना कामगारांच्या सोयीकरीता स्मॅकच्या इमारतीमध्ये सुरु व्हावा याकरीता सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचेही खासदार मंडलिक म्हणाले
Leave a Reply