मुंबई (प्रतिनिधी): मनोरंजन करण्यासाठी सध्या अनेक मोबाईल अॅप्स उपलब्ध आहेत. त्यातच या अॅप्सकरिता दरमहा खूप पैसे मोजावे लागतात. त्यातच मराठी कलाकृती आणि कलाकर्मींना समर्पित अॅप अद्याप उपलब्ध नव्हते. अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या सहयोगातून तयार करण्यात आलेल्या ‘स्टार फाईव्ह डॉट लाईव्ह’ या मोबाईल अॅपने ही उणीव भरून काढली आहे. हे अॅप पुढील वर्षाच्या सुरुवातीला (जानेवारी २०२१) सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.
‘स्टार फाईव्ह डॉट लाईव्ह’ या मोबाईल अॅपमध्ये केवळ मराठी भाषेतील नव्हे तर वेबसीरिज, शॉर्टफिल्म, साँग्ज अल्बम, एकपात्री प्रयोग (स्टँडअप शो), चित्रपटांचे प्रोमोज्, रेसिपी शो, कथाकथन तसेच कविता वाचन अशा सर्व कलाकृती पाहायला मिळणार आहेत. शिवाय हा मनोरंजनाचा खजिना सर्वांना मोफत उपलब्ध असेल. प्रत्येक प्रोजेक्टला मिळणाºया ‘व्ह्युज’चा आढावा घेत जास्तीत जास्त पाहिल्या गेलेल्या कलाकृतींना रोख पारितोषिकही दिले जाणार आहे.
मनोरंजनासह सामाजिक बांधिलकी म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या माध्यमातून कलाकृती आणि कलाकारांना गौरवताना नवोदित आणि प्रतिभावंत कलाकारांना त्यांचे कलागुण दाखवण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच राज्यातील लेखक, कवी यांना विभागवार/जिल्हा पातळीवर आमचे तंत्रज्ञ/स्टुडिओ उपलब्ध करून देणार आहोत. रेसिपी तसेच कुकिंग स्किल असणाºयांसाठीही आमच्या तंत्रज्ञांच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात येणार आहे. अशा विविध माध्यमांद्वारे निर्माता आणि कलाकर्मींना उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध करण्याचा अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचा उद्देश आहे.
Leave a Reply