
कोल्हापूर:विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघ व शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीच्या अनुक्रमे अरुण लाड व प्रा जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आज कोल्हापुरात पदवीधर व शिक्षकांचा मेळावा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंतराव पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी दोन वाजता कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये हा मेळावा होणार आहे. या प्रचार मेळाव्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार प्रा संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, यांच्यासह आमदारांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.या मेळाव्यास गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील -यड्रावकर , खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार पी.एन.पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रकाश आबीटकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजु जयवंतराव आवळे, शेकापचे माजी आमदार संपतबापू पवार -पाटील, जनता दलाचे माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे, माजी आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार के पी पाटील, माजी आमदार संजय घाटगे, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील -सरूडकर, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ए वाय् पाटील, शहराध्यक्ष आर के पोवार, राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, जिल्हाध्यक्ष विजय देवणे, शहराध्यक्ष रवी इंगवले, रिपाईचे विश्वासराव देशमुख व दगडू भास्कर या प्रमुखांसह इतर मान्यवर नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी, विधानसभाध्यक्ष व पदाधिकारी , तालुकाध्यक्ष व पदाधिकारी , नगरपालिका क्षेत्रातील शहराध्यक्ष व पदाधिकारी , जिल्हा सेलचे सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी, जिल्हा परिषद/पंचायत समिती सदस्य व पदाधिकारी, नगरपालिका/महानगरपालिका नगरसेवक व पदाधिकारी, बाजारसमिती/केडीसीसी बॅंक/सहकारी साखर कारखाना संचालक व पदाधिकारी , पक्ष संघटनेतील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीने केले आहे.ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघातील उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ शनिवारी (ता.२१) सायंकाळी पाच वाजता इचलकंजी येथे, रविवारी (ता.२२) दुपारी बारा वाजता आजरा येथे, सोमवारी (ता.२३) दुपारी बारा वाजता खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत कागल येथे मेळावा, सायंकाळी चार वाजता कोल्हापुरात कोल्हापूर शहर प्रचार नियोजन व मंगळवारी सकाळी ११ वाजता जयसिंगपूर येथे मेळावा याप्रमाणे प्रचार मेळावे होणार आहेत.
Leave a Reply