राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

 

कोल्हापूर : यावर्षीचे महाभयंकर कोरोना संकट, गेल्या दोन महिन्यात क्षीरसागर कुटुंबीयांवर कोसलेले दु:ख या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस शिवसैनिक, मित्रमंडळी आणि हितचिंतकांच्या शुभेच्छानी, नियमांचे पालन करीत अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. गेल्या दोन महिनाच्या कालावधीमध्ये निकटवर्ती हिरावल्याचे वेदनादायक अनुभव आपल्यालाही आले असतील, पण तरीही आपण एकमेकांना धीर देत कोरोना सारख्या संकटाचा सामना करत आहोत. अशा परिस्थिती वाढदिवस साजरा करणे योग्य नसल्याचे सांगत आपला वाढदिवस कोरोना योद्ध्यांच्या कार्याला समर्पित करीत असल्याचे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.राजेश क्षीरसागर यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर यांनी करवीरनिवासिनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर शिवसेना राजारामपुरी विभागाच्या वतीने पांजरपोळ येथे गोमातेचे पूजन करून गाईना डाळ, गुळ, चारा वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना विभागप्रमुख मंदार तपकिरे, सौ.अनुजा मंदार तपकिरे, शिवसेना उपशहरप्रमुख दीपक चव्हाण, विभागप्रमुख अश्विन शेळके, अंकुश निपाणीकर, युवासेना उपशहरअधिकारी दादू शिंदे, आसिफ मुल्लाणी आदी उपस्थित होते. शिवसेना शहर कार्यालय येथे शुभेच्छा स्विकारल्या. यावेळी समाजातील सर्वच स्तरातुन त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांना वाढदिवसानिमित्त आज विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटुन शुभेच्छा दिल्या. तसेच शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा सेना अध्यक्ष व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते, सचिव, राज्यातील विविध मंत्री खासदार, आमदार, नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी आदींनी मोबाईल, एसएमएस, व्हाट्‌सअप आदींच्या माध्यमातुन शुभेच्छा दिल्या. दरम्यान शुभेच्छा देणार्‍या सर्वांचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष .राजेश क्षीरसागर यांनी आभार मानले आहेत. यावेळी युवा नेते ऋतुराज क्षीरसागर आणि युवानेते पुष्कराज क्षीरसागर, शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!