नवी, स्मार्ट आणि रोमांचक बी-एसयूव्ही  रेनॉ कायगर भारतात

 

कोल्हापूर : उत्पादनांसाठीचे प्रबळ धोरण आणि उत्पादनांमध्ये आमूलाग्रनवप्रवर्तन घडवण्यासाठीची वचनबद्धता याचा भाग म्हणून, रेनॉ इंडिया हे रेनॉ  कायगर  या नव्याउत्पादनाला बाजारपेठेत आणून त्याच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांची श्रेणी आणि विभागांचे विस्तारीकरण करतील. या कारच्या माध्यमातून या क्षेत्रातील सर्व खेळच पालटून जातील. ट्रायबरची बांधणी ज्या प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे, त्याच प्लॅटफॉर्मवर या कारची बांधणी केली जाईल आणि रेनॉ ग्रुपकडून जागतिक स्तरावर ती सादर केली जाईल. रेनॉ  कायगर सोबत रेनॉ आपले नवे जागतिक स्तरावरील इंजिनही सादर करणार आहे.ग्राहकांना रेनॉ  कायगरकडून काय अपेक्षित आहे, हे पाहण्यासाठी रेनॉने  कायगर शो कार  या चे  जागतिकअनावरण केले. या  प्रदर्शनीय कारच्या संरचनेवरच रेनॉच्या नव्या एसयूव्हीची संरचना आणि विकसन करण्यात आले आहे. रेनॉ  कायगर शो कार   ही फ्रान्समधील कॉर्पोरेट डिझाईन्स टीम्स आणि रेनॉ इंडिया डिझाईन्स यांच्या सहकार्यातून तयार करण्यात आली आहे. रेनॉच्या अन्य सर्वकारप्रमाणेच रेनॉ  कायगर शो कार ची अनोखी आणि आकर्षक संरचना असून, त्यात शहरी आधुनिकता आणि शहराबाहेरही असलेली कार्यक्षमता यांचे दर्शन घडते. रेनॉ  कायगर शो कारचा बाह्यरंग आपला पाहण्याचा दृष्टीकोन आणि उजेडावर अवलंबून असतो आणि एखाद्या जादूप्रमाणे निळा आणि जांभळा असा बदलताना दिसतो. कार्यक्षम आणि आटोपशीर असलेली रेनॉ  कायगर शो कार  स्पोर्टी अनुभव देते. कारला द्विस्तरीय प्रभावी प्रकाशयोजना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!