दुचाकीस्वार गायत्री पटेल यांची “वन ड्रीम वन राइड” उपक्रमांतर्गत भारत प्रवासाला सुरुवात

 

कोल्हापूर: कोल्हापूरच्या दुचाकी स्वार गायत्री पटेल या आजपासून “वन ड्रीम वन राइड” उपक्रमांतर्गत भारत प्रवासाला सुरुवात केली. टीव्हीएस अपाचे 200 आरटी या दुचाकीवरून पुढील सहा महिन्यात गायत्री तीस हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतर या मोहिमेत पूर्ण करेल. माई टीव्हीएसमध्ये कोल्हापूर येथे झेंडा दाखवून या मोहिमेची सुरुवात झाली.वन ड्रीम वन राइड मोहिमेत गायत्री भारतातील अठ्ठावीस राज्यं, आठ केंद्रशासित प्रदेश आणि अठरा जागतिक वारसा स्थळांना भेटी देणार आहे. मुंबई, सूरत, जयपूर, दिल्ली, स्पिती, श्रीनगर, आग्रा, कोलकाता, भोपाळ, हैदराबाद, चेन्नई, कोची, कोईमतूर, बंगळुरू या शहरांमधून गायत्रीची ही मोहीम जून 21 पर्यंत पूर्ण होईल. यावेळी गायत्री यांना या मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी महापौर निलोफर आजरेकर, मोहन ऑटो इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे, संचालक दिग्विजय राजेभोसले, टीव्हीएस मोटर्सचे टेरिटरी मॅनेजर रोहित श्रीवास्तव, माई टिव्हीएसचे अनिल कांबळे व युवराज गायकवाड उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!