
पुणे: शरद पवार राजर्षी शाहु महाराजांच्या विचारांचे पाईक आहेत, म्हणून शाहू महाराजंच्या नावाने स्थापन झालेली संस्था बंद पडू नये याविषयी त्यांनी लक्ष घालावे अशी विनंती करणार असल्याचे – खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.सारथी संस्थेच्या कार्यालयाबाहेर तारादूतांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला खा.संभाजीराजे छत्रपती यांनी भेट देऊन चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.सारथी संस्था ही छत्रपती शाहू महाराजांचे जीवंत स्मारक असुन, ते वाचवण्याची जबाबदारी ही महाविकास आघाडी सरकारची आहे. ते पुढे म्हणाले, एका बाजूला सरकारने सारथी संस्थेला स्वायत्तता असल्याचे सांगितले असून, कलम 25 नुसार संचालक आम्हाला काहीच अधिकार नाहीत, सरकार निर्णय घेईल असे सांगत आहेत. यावरून अद्यापही या संस्थेला स्वायत्तता दिलेली नाही. सारथी संस्था जिवंत राहणे गरजेचे असून तारदूतांचे प्रश्न सरकारने तातडीने सोडवावेत. अन्यथा पुन्हा एकदा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा ही खा.संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी दिला.
एकीकडे शासन सारथी संस्थेला स्वायत्तता असलेले सांगत असले तरी दुस-या बाजूला सारथी संस्था तारादूतांचा प्रस्ताव मान्य करण्याचे अधिकार नसल्याचे सांगून विषय टाळत आहे व खा.संभाजीराजे छत्रपती सारथी संस्थेला भेट देणार असल्याचे माहिती असुन देखील संस्थेचे अध्यक्ष व संचालक उपस्थित नसणे ही संस्थेची बाब चुकीची आहे असे मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक धनंजय जाधव यांनी सांगितले.
Leave a Reply