विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी व बुरुजाचे काम लवकरच सुरू होणार: खा.संभाजीराजे छत्रपती

 

विजयदुर्ग: शिवछत्रपतींनी पुनर्बांधणी करून घेतलेला मराठा आरमाराच्या प्रमुख शक्ती केंद्रापैकी एक असलेल्या ‘विजयदुर्ग’ किल्ल्याची तटबंदी समुद्राच्या लाटांनी झिजवली आणि बुरुजचा भाग ढासळत असल्याचे निदर्शनास आले होते. स्वराज्यातील आरमाराचे प्रमुख शक्तिकेंद्र असलेला महत्वाचा जलदुर्ग काळाच्या ओघात विदीर्ण अवस्थेत पोहचला असल्याचे काही शिवभक्तांनी माझ्या लक्षात आणून दिले होते. या गडाला आँगस्ट महिन्यात भेट देऊन पाहणी सुध्दा केली होती तसेच केंद्रीय सांस्कृतीक मंत्री श्री.प्रल्हादसिंह पटेल यांना भेटून गडाच्या सद्य:परिस्थिती लक्षात आणून, लवकरच तटबंदीचे, व बुरुजाचे काम सूरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी केली होती.
आज मुंबई पुरातत्व कार्यालयाकडून मला पत्र प्राप्त झाले असून लवकरच गडावर संवर्धनाचे काम सुरु करण्यात येणार आहे.व त्याला दिल्लीतील डी.जी .पुरातत्व सर्वेक्षण कार्यालय कडून सुध्दा मान्यता मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!