
कोल्हापूरःशिरोली दु. ता. करवीर येथील गोकुळचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक मा.श्री. विश्वास नारायण पाटील (आबाजी) यांच्या मातोश्री कै.जनाबाई नारायण पाटील (तार्इ) यांच्या आकराव्या स्मृतिदिनानिमीत्त शनिवारी दि.१९ डिसेंबर रोजी रक्तदान शिबीर व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.रक्तदान हे श्रेष्ठदान ही संकल्पना घेवून गेली १० वर्षे रक्तदान शिबीर घेणेत येत आहे. यावर्षी शिबीराचे आकरावे वर्ष असून, शनिवारी दि.१९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबीरास प्रारंभ होणार आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा एकत्र येवून मुकाबला केल्यानंतर आता येऊ पाहणा-या कोरोनाच्या संभाव्य दुस-या लाटेसंदर्भात जागृती करण्यासाठी म्हणून अॅस्टर आधार हॉस्पीटलचे डॉ. अजय केणी यांचे कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान आयोजीत केले आहे. हे व्याख्यान शनिवारी सायंकाळी ६ वाजता श्री.बलभिम विकास सेवा संस्थेच्या प्रांगणात होणार असून कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे तसेच या रक्तदान शिबीरास तरूणांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे. असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक गोकुळचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक मा.श्री.विश्वास नारायण पाटील (आबाजी) व विश्वास नारायण पाटील फौंडेशनच्या वतीने करण्यात आले.
Leave a Reply