अंबाबाई मंदिर छतावर १ हजार टन वजनाचा कोबा असल्याने मंदिराला धोका

 

कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या छताची गळती काढण्यासाठी वेळोवेळी करण्यात आलेल्या कोब्यामुळे मंदिराच्या मुळ स्वरुपात बदल झाला आहे. तसेच जवळपास १ हजार टन वजनाचा कोबा छतावर असून लवकरच हा कोबा उतरवून मंदिर मुळ स्वरुपात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे मंदिर म्हणजे वास्तुस्थापत्य कलेचा एक वैशिष्ट्यपूर्ण नमुना मानला जातो. मंदिर जवळपास चौदाशे वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहे. शिल्पसौंदर्याने नटलेल्या मंदिराच्या मुळ स्वरुपात काळानुरूप अनेक बदल होत गेले आहेत. स्ट्रक्चरल ऑडिट नंतर एक हजार टन वजनाचा कोबा म्हणजे शंभर ट्रक मातीचा थर मंदिराच्या छतावर असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मंदिर वास्तुला बाधा निर्माण होणे स्वाभाविक आहे. मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट मुबंई येथील स्टक्टवेल डिझायनर कन्सल्टंट यांच्याकडुन करण्यात आले आहे. स्ट्रक्चरल ऑडीट करत असताना मुख्य मंदिराच्या आतमधील व बाहेरील काही भागांवर रडार टेस्टींग केले आहे. त्यामधील रिपोर्टनुसार पहिला टप्पा म्हणजे मंदिराचे छत्ताचे वाॅटर प्रुफिंग करणे हा आहे. अहवालानुसार व मंदिराच्या छतावर घेण्यात आलेल्या चाचणी खड्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेले वेगवेगळे थर याचा अभ्यास करुन त्याचे अंदाजपत्रक तयार करणेचे काम सुरु आहे. सदर अंदाजपत्रक पुरातत्व विभागाकडे मार्गदर्शन व परवानगी घेऊन कामास सुरुवात करण्यात येणार आहे.मणिकर्णिका कुंड उत्खननाच्या कामाने वेग घेतला आहे. येत्या ३ महिन्यामध्ये मणिकर्णिका कुंड खुला करण्यात येणार असुन सदर कुंड खुला झाल्यानंतर या जागेवर आवश्यक इतर विकास कामे करण्यात येणार आहेत. श्री क्षेत्र नृसिंहवाडी, जोतिबा या ठिकाणीही विकास कामांनी वेग घेतला आहे असेही त्यांनी सांगितले.सोळाशे वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे. शंभर ट्रक माती ही विनाकारण ही आई अंबाबाईच्या डोक्यावरती आहे. ते लवकरात लवकर काढणं हे येताच आहे गरजेच आहे. हे जर लवकर नाही का काढलं तर छताला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे काढून आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये आणणार असल्याचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितल. तसेच देवीच्या दागिन्यांचे तीन-चार दिवस मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्याचे मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर याची सविस्तर माहिती देवस्थान समितीच्यावतीने देण्यात येईल. या बरोबरच देवस्थान समिती
गरुड मंडळाला ऊर्जितावस्था देण्यासाठी ऑइल पेंट दिलेला आहे. तो काढून त्या ठिकाणी त्याला लाकडाचा रूप देण्यात येणार आहे.
भक्तनिवास पूर्णत्वास आलेल असून गडहिंग्लजला कालभैरव मंडपाचे दोन कोटीचे काम बांधून तयार आहे. याचे उद्घाटन होणार आहे. सात मजली भक्तनिवास बिल्डिंग, मजली व पार्किंगच्या कामाला सुरुवात करत आहोत. कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी असणाऱ्या सर्व ३०४२ मंदिर आणि २८००० एकर जमीन या सर्वेला सुरुवात झाली असून सर्वांचा एक हजार जमिनीचा सर्वे पूर्ण झालेला आहे. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिळणारा मोबदला मिळणार आहे.असेही श्री.जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!