काँग्रेस नेतृत्व बदलण्याच्या चर्चेऐवजी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर तोडगा निघणे गरजेचे : सुशील कुमार शिंदे

 

कोल्हापूर : ( राजेंद्र मकोटे ) सध्या दिल्ली सुरू असलेले शेतकरी आंदोलन अत्यंत संवेदनशील बनले असून त्याची व्याप्ती देशभर जाण्या पुर्वीच र तोडगा निघणे गरजेचे आहे ,हा आताचा ज्वलंत प्रश्न असून काँग्रेस नेतृत्व बदल हे याविषयी चर्चा सध्या गौण आहेत ” असे प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केले. प्रसिद्ध शल्यविशारद डॉक्टर वि.ह. वझे मार्ग नामकरण अनावरण सोहळा त्यांच्या हस्ते ताराबाई पार्क परिसरात पार पडला ,या सोहळ्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.” राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे गेली एक वर्षे व्यवस्थित काम करीत आहे त्यामुळेच त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहे, कोरोना परिस्थितीत यांनी योग्यपणे हाताळली आली आहे असेही मत त्यांनी या संदर्भाने व्यक्त केले . केंद्र सरकार रेल्वेपासून विमानतळापर्यंत सर्वांचेच खाजगीकरण करत आहे, भविष्यात आणखी कशाकशाचे खाजगीकरण कळेल हे कळू शकत नाही अशी मार्मिक प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. शताब्दी वर्षाची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाने अनेक चढ-उतार पाहिले आहे मात्र जनसामान्यांशी असलेली जुळलेली नाळ काँग्रेसला पुन्हा एकदा ऊर्जित अवस्था प्राप्त करून देईल असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला . आजच्या अत्यंत व्यवहारी वैद्यकी विश्वाला विश्वास बसणार नाही इतक्या समर्पित वृत्तीने डॉक्टर वझे यांनी एक अधिसारा व्रत म्हणून आपले वैद्यकीय पेशा आयुष्यभर जपला ,त्याचा यथोचित गौरव महानगरपालिके महानगरपालिकेने केला आहे असेही या समारंभात बोलताना त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले . यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज त्यांनीही आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना वाझे यांनी वैद्यकीय क्षेत्रात रुजवलेल्या पाऊलवाटा नव्या पिढीला अनुकरणीय आहेत सर्व असे मत व्यक्त केले. पालकमंत्री सतेज पाटील वाटलं नव्या पिढीला या सोहळ्यातून डाँक्टर वझे यांचे प्रेरणादायी काम अजून नक्की प्रकर्षाने समजून येईल असे प्रतिपादन केले .यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, नवोदीत शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी सर्वांचे स्वागत अनंत माने यांनी केले तर आभार डॉक्टर गिरीश महाजन यांची माहिती यांनी मानले .सुत्र संचलन सीमा मकोटे यांनी केले.या सोहळ्यास सरलाताई पाटील , महापौर नीलोफर अजगेकर अर्जुन माने , गटनेते शारंगधर देशमुख ,अशोक जाधव, डाँ. संजय डी पाटील , गुलाबराव घोरपडे , यांच्यासह कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!