कोल्हापूर राज्यात आदर्शवत करू:आ.चंद्रकांत जाधव

 

कोल्हापूर: राज्यात महाविकास आघाडी सरकारने विकास कामाचा वेग धरला पण कोरोना आडवा आला. निसर्गा पुढे कोणाचे चालत नाही. राज्याची आर्थिकस्थिती नाजुक आहे. त्यामुळे विकास कामाचा प्राधान्यक्रम ठरवून, येत्या चार वर्षात मतदार संघातील सर्व विकासकामे पूर्ण करून, कोल्हापूर शहर राज्यात आदर्शवत करू असा विश्वास आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिले.
सम्राटनगर प्रभागातील चाणक्य नगरमध्ये रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते होते. अध्यक्षस्थानी आमदार ऋतुराज पाटील होते. नगरसेविका जयश्री जाधव, कॉग्रेस माहिला शहराध्यक्ष संध्या घोटणे प्रमुख उपस्थित होत्या.आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या माध्यमातून सरकारकडून मोठया प्रमाणात निधी आणून, दक्षिण विधानसभा मतदार सर्व विकासकामे मार्गी लावू.
रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाच्या शुभारंभ विलासराव सपाटे, हणमंत पवार, चंद्रकांत जाधव, प्रमोद कुरणे, दुर्गेश वळवी, नितीन परूळेकर, शुभलक्ष्मी देशमुख, सरीता गवळी, तेजस्विनी मोहीते, श्रध्दा कोंडूसकर, श्रीमती सुनीला कदम, मीना पाटील, नंदिनी पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला.
यावेळी आमदार जाधव, आमदार पाटील यांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधला व विकासकामाबद्दल नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. तसेच रस्त्याच्या कामाची पाहणी करून, कामाची गुणवत्ता व दर्जाबाबत सुचना दिल्या.
प्रदिप जाधव, सर्जेराव साळोखे, रणधीर माने, अनिल पाटील, कपील मोहीते, अनिकेत सावंत, शांताराम पाटील, केदार पाटील, देवेंद्र रेडेकर, स्वप्निल रजपूत, चेतन भिसे, संजय आवटी, स्वरूपा खुरंदळे, सुनीता पाटील, पी. डी. पाटील, शशिकांत चव्हाण, विजय पोवार, सुहास कारेकर, बसलिंग खराडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!