
कोल्हापूर: दि.१९ व २० डिसेंबर रोजी भाजपा कोल्हापूर महानगरच्या वतीने राधाबाई मंगल कार्यालय, शिवाजी पेठ व इंद्रप्रस्त हॉल, राजारामपुरी येथे ०२ दिवसाचे जिल्हास्तरीय पं.दिनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग संपन्न झाले. या प्रशिक्षण वर्गाचे उदघाट्न प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या हस्ते करणात आले. यावेळी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर, विजय खाडे इत्यादी प्रमुख़ नेत्यांच्या उपस्थितीत या प्रशिक्षण वर्गाचे उदघाट्न सत्र संपन्न झाले.प्रशिक्षण वर्गाच्या सुरवातीला भारतमाता, पं.दिनदयाल उपाध्याय, शामाप्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या ह्स्ते करण्यात आले. याप्रसंगी आपल्या प्रास्ताविकात बोलताना जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले की, या अभ्यास वर्गातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वक्त्यांचे विचार समजुन घेवुन संघट्ना विस्तारासाठी प्रयत्नशील रहावे. तसेच व्यक्तीला परिपक्व होण्यासाठी प्रशिक्षणाची गरज प्रत्येक क्षेत्रात असते. पण राजकीय क्षेत्रात प्रशिक्षण वर्ग हा फक्त भारतीय जनता पार्टी आपल्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित करत असल्याचे नमूद केले.
Leave a Reply