कोविड-19 लसीकरणाच्या नियोजनाबाबत सिटी टास्क फोर्सची स्थापना प्रशासक डॉ.कांदबरी बलकवडे यांच्याकडून आढावा बैठक

 

कोल्हापूर: शासन निर्देशानुसार कोविड-19 लसीकरणाच्या नियोजनाबाबत सिटी टास्क फोर्सची स्थापना महापालिकेच्यावतीने करण्यात आलेली आहे. या समितींच्या सदस्यांची आज प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या आध्यक्षतेखाली आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये कोविड लसीकरणाच्या अनुषगाने नियोजनाचे स्लाईड शो द्वारे डॉ. अमोल माने यांनी सादरीकरण केले. यामध्ये सरकारी व खाजगी मिळून एकूण 9454 इतक्या आरोग्य कर्मचा-यांची नोंदणी पोर्टलवर केलेबाबत तसेच लस साठवणुकीबाबत पुरेशी कोल्डस्टोरेज उपकरणे उपलब्ध असलेबाबत डॉ.अशोक पोळ यांनी सांगितले. या बैठकीमध्ये प्रशासक डॉ. बलकवडे यांनी लसीकरणाच्या पुर्व तयारीबाबत आढावा घेतला. तसेच सदर लसीकरण तीन ते चार टप्यांमध्ये करण्यात येणार असून लसीकरणाच्या पहिल्या टप्यामध्ये सरकारी व खाजगी आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात येणार असून त्यांची माहिती कोविन पोर्टलवर अद्यावत केलेली आहे. सदर कर्मचाऱ्यांना लस देण्याकरीता नियोजनबध्द कृती आराखडा सादर करणेबाबत आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ यांना निर्देश दिले. यामध्ये आवश्यकतेनुसार लसीकरण सत्रांच्या ठिकाणांची निवड करुन त्या ठिकाणी शासन मार्गदर्शनानुसार जागा उपलब्ध करुन सत्रांचे नियोजन करणेबाबत सूचित केले. याशिवाय शहरातील ओपीडी डे-केअर क्लिनिक इत्यांदीची माहिती ही अद्यावत करणेबाबत सुचना केल्या.
त्याच बरोबर दि. 17 जानेवारी 2021 रोजी होणाऱ्या पल्सपोलिओ मोहिमेच्या अनुषंगानेे लसीकरण अधिकारी डॉ. रुपाली यादव यांनी स्लाईड शो द्वारे पल्सपोलिओ मोहिमेच्या नियोजनाबाबत सादरीकरण केले. यावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी राष्ट्रीय पल्सपोलिओ मोहिम पुर्ण क्षमतेने 100 टक्के यशस्वी करणाच्या सुचना दिल्या. या माहिमे दरम्यान 0 ते 5 या वयोगटातील एकही लाभार्थी लसीकरणा पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेणेबाबत सांगितले. शहरामध्ये एकूण 48638 इतक्या बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दीष्ठ असून रविवार दि.17 जानेवारी 2020 रोजी ज्या बालकांना डोस मिळणार नाही अशा बालकांकरीता पुढील 5 दिवस घरभेटद्वारे पोलिओ डोस पाजण्यात येणार असलेबाबत डॉ.पोळ यांनी सांगितले. या मोहिमेच्यावेळेस कोवीड-19 च्या अनुषंगाने मास्क व सॅनिटायझर वापर तसेच सामाजिक अंतर पाळून सदरची मोहिम राबविण्यात येणार आहे.
सदर बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डीवायएसपी शहर मंगेश चव्हाण, सहा.आयुक्त संदिप घारगे, कोल्हापूर वैधिकीय संघटणा प्रतिनिधी डॉ. गिता पिल्लई, कोल्हापूर स्त्रीरोग संघटणा अध्यक्षय डॉ. मंजूशा पिशवीकर, समन्वयक राष्ट्रीय छात्र सैना अभय जायभाय, समन्वयक राष्ट्रीय छात्र सैना सब अत्ताफ, कामगार अधिकरी सुधाकर चल्लावड, रोटरी प्रतिनिधी डॉ. आर.एस.पाटील, जनरल प्रॅक्टशनर्स असोसिएशनचे डॉ.शिरीष पाटील व डॉ.अरुण मुधाळे, तसेच प्रशासन वैद्यिकिय अधिकारी डॉ.प्रकाश पावरा, डॉ.विद्या काळे, डॉ.विजय मुसळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!